Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

20 Oct 2026

12 linked posts
अंबरनाथमध्ये नवरात्रोत्सवाला भेट, रास-गरबा व वाढदिवस साजरा! Reel

🌺💃 अंबरनाथमधील नवरात्रोत्सव मंडळांना सदिच्छा भेट, रास-गरबा आणि वाढदिवसाचा आनंद! 🎂🙏

नवरात्रोत्सवानिमित्त अंबरनाथमधील विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी नागरिकांसोबत रास-गरब्यात सहभागी होत नवरात्रीच्या उत्साहाचा मनमुराद आनंद लुटला. याच आनंदी वातावरणात माझ्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्वांचे प्रेम, आपुलकी आणि शुभेच्छांमुळे हे क्षण माझ्यासाठी विशेष आनंददायी ठरले. 🌸❤️

याप्रसंगी गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील,नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. पवन वाळेकर, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेविका सौ. मिनू सिंग, अंबरनाथ शहर उपाध्यक्ष श्री. मिलिंद गान, सौ. चंदा मिलिंद गान आणि डॉ.अल्पना गुलाबराव करंजुले पाटील व इतर मान्यवरांसह देवीचे दर्शन घेत गरब्याचा आनंद घेतला

मातेचा आशीर्वाद, नवरात्रीचा उत्साह आणि आपणा सर्वांचे प्रेम हीच माझ्यासाठी वाढदिवसाची अनमोल भेट! 🙏🌺

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

अंबरनाथमध्ये नवरात्रोत्सव मंडळांना भेट व रास-गरब्याचा आनंद! Reel

🌺💃 अंबरनाथमधील नवरात्रोत्सव मंडळांना सदिच्छा भेट आणि रास-गरब्याचा आनंद! 🙏

नवरात्रोत्सवानिमित्त अंबरनाथमधील विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंडळातील सदस्य आणि नागरिकांसोबत रास-गरब्यात सहभागी होत नवरात्रीच्या उत्साहाचा आनंद लुटला. सर्वांसोबत गरबा खेळताना मनाला विशेष आनंद आणि प्रसन्नता लाभली. भक्ती, उत्साह आणि आनंदाने भरलेले हे क्षण कायम स्मरणात राहतील. 🌸✨

याप्रसंगी नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील,गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. पवन वाळेकर,नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ समाजसेवक श्री. चरण रसाळ, नगरसेविका सौ. अर्चना रसाळ,

नगरसेविका सौ. अनिता भोईर, कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. ज्योती धारवीन आणि इतर मान्यवरांसोबत देवीचे दर्शन घेत गरब्याचा आनंद लुटला

मातेचा आशीर्वाद, सर्वांचे प्रेम आणि नवरात्रीचा उत्साह यामुळे हा अनुभव अधिकच आनंददायी ठरला! 🙏🌺

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

डोंबिवलीत नवरात्रोत्सवाला सदिच्छा भेट व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत! Reel

🙏🌺 डोंबिवली येथे शारदीय नवरात्रोत्सवाला सदिच्छा भेट आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात!

काल डोंबिवली येथील डीएनसी शाळेच्या मैदानात डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाला भेट दिली. यावेळी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली आणि आयोजकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

माझ्या वाढदिवसानिमित्त राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ₹५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश सन्माननीय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश माजी नगराध्यक्ष श्री. गुलाबराव करंजुले पाटील, श्री. विश्वजीत करंजुले पाटील, CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील आणि श्री. अभिजीत करंजुले पाटील यांच्या वतीने मदतीच्या भावनेतून देण्यात आला.

यावेळी नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. पवन वाळेकर, नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. रूपाली लठ्ठे, डॉ. अल्पना गुलाबराव करंजुले पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी हातभार लावता आला, हे माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. सण-उत्सवांच्या आनंदासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा छोटासा प्रयत्न! 🙏🌾

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

एमएससी बिझनेस पार्क नवरात्रोत्सव मंडळाला सदिच्छा भेट! Photos

🌺🙏 एमएससी बिझनेस पार्क येथील नवरात्रोत्सव मंडळाला सदिच्छा भेट! 🌸

काल एमएससी बिझनेस पार्क येथे व्यावसायिक श्री. हसमुख हरिया यांच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी मंडळाच्या वतीने आमचा सत्कार करण्यात आला. देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आणि उत्सवाच्या मंगलमय वातावरणाचा आनंद अनुभवला.

याप्रसंगी नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. पवन वाळेकर, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील आणि डॉ. अल्पना गुलाबराव करंजुले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मातेचा आशीर्वाद, आपणा सर्वांचे प्रेम आणि सन्मान हीच माझ्यासाठी आनंदाची बाब! 🙏🌺

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

डोंबिवली येथील नमो रमो नवरात्र उत्सवाला सदिच्छा भेट! Photos

🌺🙏 डोंबिवली येथील नमो रमो नवरात्र उत्सवाला सदिच्छा भेट! 🙏🌸

काल डोंबिवली येथे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वतीने आयोजित नमो रमो नवरात्र उत्सवाला सदिच्छा भेट दिली. यावेळी उत्सवातील भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला आणि देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

याप्रसंगी नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. पवन वाळेकर, नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे आणि नगरसेविका सौ. सुजाता भोईर, महिला मोर्चा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सौ.रुपाली लठ्ठे महिला मोर्चा अध्यक्ष अंबरनाथ पश्चिम सौ.पौर्णिमा जाधव, डॉ.अल्पना गुलाबराव करंजुले पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

नवरात्रोत्सवाच्या मंगलमय वातावरणात देवीचे दर्शन आणि भक्तीचा आनंद अनुभवता आला! 🙏🌺

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

म्हस्के गार्डन येथे महाभोंडला व हळदी-कुंकू कार्यक्रमाला सदिच्छा भेट! Photos

🎉🌸 महाभोंडला व हळदी-कुंकू कार्यक्रमाला सदिच्छा भेट! 🙏

काल म्हस्के गार्डन येथे नगरसेविका सौ. सुजाता दिलीप भोईर यांच्या वतीने आयोजित महाभोंडला, हळदी-कुंकू, महिलांच्या विविध स्पर्धा आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाला भेट दिली. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि आनंदी वातावरणाने हा कार्यक्रम विशेष ठरला.

यावेळी नगरसेविका सौ. सुजाता दिलीप भोईर आणि नगरसेविका सौ. अश्विनी सचिन पाटील, डॉ.अल्पना गुलाबराव करंजुले पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत शुभाशीर्वाद दिले. सर्वांचे प्रेम, आपुलकी आणि सदिच्छा मनाला आनंद देणाऱ्या ठरल्या. ❤️🙏

आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझ्यासाठी वाढदिवसाची अनमोल भेट! 🌺

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

वाढदिवसानिमित्त गावदेवीचे दर्शन व सत्कार! Photos

🙏🌺 वाढदिवसानिमित्त गावदेवीचे दर्शन आणि सत्कार!

काल माझ्या वाढदिवसानिमित्त नवीन वडवली, अंबरनाथ येथील श्री क्षेत्र गावदेवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरात माझा सत्कार करण्यात आला. देवीचे आशीर्वाद आणि सर्वांचे प्रेम लाभल्याने मनाला विशेष आनंद व समाधान मिळाले.

याप्रसंगी नगरसेवक तथा अंबरनाथ शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, नगरसेविका सौ. रंजना कोतेकर, नगरसेविका तथा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती सौ. रेश्मा गुडेकर, समाजसेवक श्री. सचिन गुडेकर, कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. हर्षदा उमेश पवार, समाजसेवक श्री. उमेश गजानन पवार आणि OBC मोर्चा अध्यक्ष श्री. दीपक कोतेकर यांच्यासह इतर मान्यवरांनी मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आशीर्वाद दिले.

गावदेवीचा आशीर्वाद आणि आपणा सर्वांचे प्रेम व सदिच्छा हीच माझ्यासाठी वाढदिवसाची अनमोल भेट! 🙏❤️

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

वाढदिवसानिमित्त वुलन चाळ येथील बेघर निवारा केंद्राला भेट photo

❤️ वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंदाचे क्षण! 🎂🙏

काल माझ्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ पश्चिम येथील वुलन चाळ बेघर निवारा येथे ज्येष्ठ नागरिकांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने महिला मोर्चा अध्यक्षा सौ. पौर्णिमा मनोज जाधव यांच्या पुढाकाराने भोजनाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंदाचे क्षण घालवून त्यांचे आशीर्वाद मिळणे, ही माझ्यासाठी अनमोल भेट ठरली.

याप्रसंगी अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड, नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, गटनेते, कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा अंबरनाथ पश्चिम सौ. पौर्णिमा मनोज जाधव, युवा उपाध्यक्ष श्री. शुभम मनोज जाधव, डॉ. अल्पना गुलाबराव करंजुले पाटील, कु. श्रुती आशिष सुर्वे, सौ. कल्पना चलवादी, सौ. वंचल सोनी, श्री. गणेश जाधव आणि श्री. वैभव गायकवाड यांच्यासह इतर मान्यवरांनी मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत शुभाशीर्वाद दिले.

समाजातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे, हीच खरी सेवा! ❤️🙏

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

पालेगाव पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन! Reel

पालेगाव येथे पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन! 🙏🌿

पालेगाव परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याची सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने काल पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित सुविधांना प्राधान्य देणे, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. या विकासकामामुळे भविष्यात परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास आहे.

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार श्री. किसन कथोरे, माजी नगराध्यक्ष श्री. गुलाबराव बाबुराव करंजुले पाटील, नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, गटनेते, कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, नगरसेवक श्री. सुनील वाघे, नगरसेविका सौ. पायल सोरखादे, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती अतिश पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील आणि अंबरनाथ शहर उपाध्यक्ष तथा सारा आधार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. किशोर सोरखादे

यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत, अंबरनाथच्या विकासासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल! 💧🌿

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

वाढदिवसानिमित्त रुद्राभिषेक पूजा Reel

काल माझ्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ येथील ऐतिहासिक प्राचीन शिवमंदिरात शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्या समवेत भगवान महादेवांचा रुद्राभिषेक विधी भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी भगवान महादेवांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अंबरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.

याप्रसंगी गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

भगवान महादेवांचा आशीर्वाद सदैव सर्वांवर राहो आणि समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्याची शक्ती मिळो, हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दिन शुभेच्छा Graphic

🚩 राष्ट्र प्रथम, समाजहित सर्वोच्च! 🇮🇳

भारतीय संस्कृतीचे जतन, व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माण, शिस्तीतून सामर्थ्य आणि सेवेतून समाजपरिवर्तन हा विचार प्रत्येक स्वयंसेवकाच्या कार्यातून समाजापर्यंत पोहोचत राहो.

राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता, स्वदेशीचा अभिमान आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचा अंगीकार करून सशक्त, संघटित आणि संस्कारक्षम भारत घडविण्याचा संकल्प अधिक दृढ होवो!

🚩 संघभावना हीच शक्ती, राष्ट्रसेवा हाच ध्यास!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

दसरा शुभेच्छा graphic

दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼

प्रभू श्रीरामांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन अहंकार, अन्याय आणि वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचा संकल्प करूया.प्रभू श्रीरामांनी रावणावर मिळवलेला विजय आणि देवी दुर्गेने महिषासुराचा केलेला वध हा सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय दर्शवतो. विजयादशमीचा हा मंगलमय सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, यश आणि नव्या संधी घेऊन येवो, हीच सदिच्छा! 🙏

आपणा सर्वांना दसरा व विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ✨

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद