भाजपा कार्यालय अंबरनाथ येथे संघटनात्मक बैठक पार पडली. यावेळी पक्षाच्या कार्याबाबत तसेच आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला नगरसेविका तथा महिला बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती पाटील, नगरसेवक श्री. मनीष गुंजाळ, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, नगरसेविका सौ. मिना वाळेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनसेवेचा संकल्प अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷