Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

19 Oct 2026

12 linked posts
वाढदिवसानिमित्त गावदेवीचे दर्शन. Photos

आज माझ्या वाढदिवसानिमित्त गावदेवीचे दर्शन घेऊन देवीचा आशीर्वाद घेतला. यावेळी नगरसेवका जोस्ना भोईर यांच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. मिळालेला सन्मान आणि शुभेच्छा माझ्यासाठी निश्चितच आनंददायी आहेत.

याप्रसंगी नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, गटनेते, कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर , नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे, नगरसेवका रोहिणी भोईर व समाजसेवक चंद्रकांत भोईर उपस्थित होते.

गावदेवीच्या आशीर्वादाने आणि आपणा सर्वांच्या प्रेम व सदिच्छांनी समाजसेवेचे कार्य अधिक निष्ठेने आणि समर्पित भावनेने करण्याची ऊर्जा मिळो, हीच देवीच्या चरणी प्रार्थना! 🙏🌸

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नवीन वडवली, आरक्षण क्र. १३२ येथे श्वान निर्बीजीकरण केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन! Photos

अंबरनाथ पश्चिम येथील नवीन वडवली, आरक्षण क्र. १३२ येथे श्वान निर्बीजीकरण केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन! 🙏🐕

आज अंबरनाथ पश्चिम येथील नवीन वडवली, आरक्षण क्र. १३२ येथे श्वान निर्बीजीकरण केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, प्राण्यांचे आरोग्य जपणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मयुरेश भुजबळ, शहर अभियंता श्री. राजेश तडवी, नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, गटनेते, कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नगरसेविका सौ. रोहिणी भोईर, नगरसेविका तथा उपसभापती सौ. किरण चौबे आणि माजी नगरसेवक श्री. मिलिंद पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

प्राणी कल्याण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल! 🐾

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

म्हस्के गार्डन येथे बंदिस्त व्यायामशाळेच्या उभारणीच्या कामाचे भूमिपूजन! Photos

नगरसेविका सौ. सुजाता भोईर आणि नगरसेविका सौ. अनिता भोईर यांच्या प्रभागातील म्हस्के गार्डन येथे बंदिस्त व्यायामशाळा उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन! 🙏🏋️

आज अंबरनाथ मधील म्हस्के गार्डन येथे बंदिस्त व्यायामशाळा उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. नागरिकांना व्यायामासाठी चांगली सुविधा उपलब्ध व्हावी आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

यावेळी नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, गटनेते, कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे, महिला व बालकल्याण समिती सभापती तथा नगरसेविका सौ. स्वाती अतिश पाटील, नगरसेविका सौ. रोहिणी भोईर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सुदृढ नागरिक, उत्तम आरोग्य आणि विकसित अंबरनाथ! 💪

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

आनंद पार्क उद्यान सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन! Photos

नगरसेविका सौ. रोहिणी भोईर यांच्या प्रभागातील आनंद पार्क येथील उद्यानातील सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन! 🙏🌳

आज आनंद पार्क येथील उद्यानातील सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. परिसरातील नागरिकांना सुंदर, स्वच्छ आणि हिरवेगार वातावरण उपलब्ध व्हावे, तसेच उद्यानाचा विकास होऊन नागरिकांना विरंगुळ्यासाठी चांगली जागा मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

यावेळी नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, गटनेते, कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ आणि नगरसेविका सौ. सुजाता भोईर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सुंदर उद्याने, हरित परिसर आणि विकसित अंबरनाथ!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

रॉयल पार्कजवळ नवीन पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कामाचे भूमिपूजन Photos

नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ व महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती अतिश पाटील यांच्या प्रभागातील रॉयल पार्कजवळ पाण्याच्या टाकीपासून प्रभागात पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन पाईपलाईनच्या कामाचे भूमिपूजन! 🙏

आज रॉयल पार्कजवळ पाण्याच्या टाकीपासून प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या नवीन पाईपलाईनच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामामुळे प्रभागातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत होणार असून, नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

नागरिकांच्या दैनंदिन पाण्याच्या गरजा पूर्ण करणे, पाणीपुरवठ्याचे जाळे अधिक सक्षम करणे आणि परिसरातील मूलभूत सुविधांचा विकास साधणे, या उद्देशाने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, गटनेते, कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. पवन वाळेकर, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नगरसेविका, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील, कामगार आघाडी अध्यक्ष श्री. बापूसाहेब शिंदे, समाजसेवक श्री. चेतन चव्हाण आणि समाजसेवक श्री. दुर्गेश चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा आणि प्रभागाच्या विकासासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल! 💧

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

पाईपलाईन रोडवरील CNG पंपाजवळ सिग्नल यंत्रणेचे भूमिपूजन photos

अंबरनाथ येथील पाईपलाईन रस्त्यावरील CNG पेट्रोल पंपाजवळ वाहतूक सिग्नल यंत्रणेच्या कामाचे भूमिपूजन 🙏

आज पाईपलाईन रस्त्यावरील CNG पेट्रोल पंपाजवळ वाहतूक सिग्नल यंत्रणा बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

वाहतुकीचे योग्य नियोजन, रस्त्यांवरील सुरक्षितता आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने उभारण्यात येणारी ही सिग्नल यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शहरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर अशा सुविधा विकसित करणे ही काळाची गरज आहे.

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मयुरेश भुजबळ, शहर अभियंता श्री. राजेश तडवी, नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील,गटनेते, कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. पवन वाळेकर, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे, अंबरनाथ शहर उपाध्यक्ष श्री. किशोर सोरखादे, नगरसेविका सौ. पायल सोरखादे, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, महिला व बालकल्याण समिती सभापती तथा नगरसेविका सौ. स्वाती अतिश पाटील,युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, नगरसेवक श्री. सुनील वाघे, आणि

यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सुरक्षित वाहतूक, सक्षम पायाभूत सुविधा आणि विकसित अंबरनाथच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल! 🚦

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

अंबरनाथच्या पाईपलाईन रोडवरील टी-जंक्शन येथे वाहतूक सिग्नल यंत्रणेचे भूमिपूजन photos

अंबरनाथ येथील पाईपलाईन रस्त्यावरील टी-जंक्शन येथे वाहतूक सिग्नल यंत्रणेच्या कामाचे भूमिपूजन 🙏

आज पाईपलाईन रस्त्यावरील टी-जंक्शन येथे वाहतूक सिग्नल यंत्रणा बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सुरळीत करण्यास मदत होणार असून, वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्त राखणे, अपघातांचा धोका कमी करणे आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे, या दृष्टीने वाहतूक सिग्नल यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, गटनेते,कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. पवन वाळेकर, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे,अंबरनाथ शहर उपाध्यक्ष श्री. किशोर सोरखादे, नगरसेविका सौ. पायल सोरखादे, महिला व बालकल्याण समिती सभापती तथा नगरसेविका सौ. स्वाती अतिश पाटील,युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, नगरसेवक श्री. सुनील वाघे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सुरक्षित वाहतूक, शिस्तबद्ध रस्ते आणि नागरिकांच्या हितासाठीएक महत्त्वपूर्ण पाऊल! 🚦

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

पालेगाव पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन photos

पालेगाव येथे पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन! 🙏

आज पालेगाव येथे पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याची सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, या विकासकामामुळे भविष्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून परिसराचा सर्वांगीण विकास साधणे आणि पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या सुविधांना प्राधान्य देणे, हे विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार श्री. किसन कथोरे, माजी नगराध्यक्ष श्री. गुलाबराव बाबुराव करंजुले पाटील, नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, गटनेते, कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, नगरसेवक श्री. सुनील वाघे, नगरसेविका सौ. पायल सोरखादे, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती अतिश पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील आणि अंबरनाथ शहर उपाध्यक्ष तथा सारा आधार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. किशोर सोरखादे

यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देत विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल! 💧🌿

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

वाढदिवसानिमित्त गोशाळेला भेट Photos

🐄🌿 वाढदिवसानिमित्त उल्हासनगर येथील गौशाळेला सदिच्छा भेट! 🙏

माझ्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर येथील गौशाळेला सदिच्छा भेट देऊन गोमातेचे दर्शन घेण्याचा आणि तिची सेवा करण्याचा योग आला. यावेळी गोमातेचे दर्शन घेऊन मनाला विशेष समाधान व प्रसन्नता लाभली. 🙏

भारतीय संस्कृतीत गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व असून, गोसेवा हीच ईश्वरसेवा मानली जाते. गोमातेचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण करणे ही केवळ आपली परंपरा नसून, आपली नैतिक जबाबदारीदेखील आहे.

या वाढदिवसाच्या निमित्ताने गोमातेचे आशीर्वाद लाभले, ही माझ्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. गोमातेच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना! 🐄🙏

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

वाढदिवसानिमित्त रुद्राभिषेक पूजा Photos

आज माझ्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ येथील ऐतिहासिक प्राचीन शिवमंदिरात शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्या समवेत भगवान महादेवांचा रुद्राभिषेक विधी भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी भगवान महादेवांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अंबरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.

याप्रसंगी गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

भगवान महादेवांचा आशीर्वाद सदैव सर्वांवर राहो आणि समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्याची शक्ती मिळो, हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

माता सिद्धिदात्री Graphic

नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी नवदुर्गेतील नववे स्वरूप असलेल्या माता सिद्धिदात्री यांची पूजा केली जाते. ‘सिद्धी’ म्हणजे अलौकिक शक्ती किंवा विशेष उपलब्धी आणि ‘दात्री’ म्हणजे प्रदान करणारी. त्यामुळे माता सिद्धिदात्री यांना भक्तांना सिद्धी, ज्ञान आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारी देवी मानले जाते.

या पावन दिनी माता सिद्धिदात्रीच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश लाभो, तसेच प्रत्येकाला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे बळ मिळो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नवरात्री उत्सव देवी सिद्धीदात्री / लता मंगेशकर Video

माता सिद्धिदात्री या नवदुर्गेच्या नवव्या स्वरूप आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, त्या आपल्या भक्तांना सिद्धी आणि सामर्थ्य प्रदान करतात. याच दिवशी आपण आठवण करतो अशा एका महान गायिकेची, जिने आपल्या अद्वितीय स्वरांनी भारतीय संगीतविश्वात अजरामर स्थान निर्माण केलं - लता मंगेशकर!

१९२९ मध्ये जन्मलेल्या लता मंगेशकर यांनी हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायली. २००१ मध्ये त्यांना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं. त्यांच्या आवाजाने प्रेमाला शब्द मिळाले, विरहाला भावना मिळाल्या आणि देशभक्तीला स्वर मिळाला.

माता सिद्धिदात्री या सिद्धी आणि सामर्थ्याचं प्रतीक मानल्या जातात, तर लता मंगेशकर या आपल्या अद्वितीय प्रतिभेचं आणि संगीतसाधनेचं सर्वोत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या सुरांनी भारतीय संगीताला समृद्ध केलं आणि अनेक पिढ्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

नवरात्रीच्या या नऊ दिवसांत आपण जाणून घेतला नऊ देवींचा महिमा आणि त्यांच्या गुणांमधून प्रेरणा देणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा प्रवास!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद