Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

17 Oct 2026

4 linked posts
नवी दिशा तृतीयपंथी समाज संघ कार्यक्रम Photos

तृतीयपंथी समाजसेविका हुस्नाताई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजसेविका छकुलीताई बनसोडे यांच्या आयोजनातून ‘नवी दिशा तृतीयपंथी समाज संघ, अंबरनाथ’ यांच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला.

यावेळी महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर, विविध खेळ आणि मज्जा मस्ती कार्यक्रम पार पडले तसेच देवीची आरती करून आदिशक्तीचे आशीर्वाद घेतले.

महिलांच्या कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला. या सुंदर आयोजनासाठी सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Leeway School नवरात्रोत्सव Photos

पालेगाव, अंबरनाथ येथील Leeway School मध्ये नवरात्रीनिमित्त आयोजित आरती सोहळ्यास उपस्थित राहून आई जगदंबेचे आशीर्वाद घेतले.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी नवरात्रीच्या पावन पर्वाचे महत्त्व अधोरेखित करणारे अतिशय सुंदर नाट्य तसेच मल्लखांब प्रात्यक्षिक सादर केले. त्यांच्या सादरीकरणातील आत्मविश्वास, शिस्त आणि उत्साह खरोखरच कौतुकास्पद होता. यानंतर विद्यार्थी आणि शिक्षिकांसोबत गरब्याच्या तालावर ठेका धरत नवरात्रीचा आनंद द्विगुणित झाला.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे, भारतीय संस्कृती आणि परंपरांचे जतन करणारे असे उपक्रम नव्या पिढीमध्ये संस्कार, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव रुजवण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत. या सुंदर आयोजनासाठी Leeway School च्या संपूर्ण शिक्षकवृंदाचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नवरात्र उत्सव देवी कालरात्री / पी. व्हि. सिंधू Video

नवरात्रीच्या सातव्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता कालरात्री या अंधकार, भय आणि दुष्ट शक्तींचा नाश करणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहेत. याच निर्भयतेचं प्रेरणादायी उदाहरण म्हणजे भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू!

२०१६ च्या रिओ आणि २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदकं जिंकून सिंधू यांनी भारतीय क्रीडा इतिहासात मानाचा ठसा उमटवला. त्यांच्या यशामागे कठोर मेहनत, शिस्त, जिद्द आणि आव्हानांना सामोरं जाण्याचं धैर्य आहे.

माता कालरात्रींचा संदेश आणि सिंधूंचा प्रवास आपल्याला शिकवतो की, भीतीवर विजय आणि मेहनतीची साथ असेल, तर कोणतंही आव्हान अशक्य नाही!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

माता कालरात्री Graphic

नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता दुर्गेच्या सातव्या स्वरूपाची, माता कालरात्रीची पूजा केली जाते. देवीचे हे स्वरूप अत्यंत शक्तिशाली असून, दुष्ट शक्तींचा नाश करणारे आणि भक्तांना भयमुक्त करणारे मानले जाते.

माता कालरात्री अज्ञान, नकारात्मकता आणि संकटांचा अंधकार दूर करून भक्तांच्या जीवनात धैर्य, शक्ती आणि सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण करतात.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद