भारतीय जनता पार्टी, अंबरनाथ शहर यांच्या वतीने माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘सेवा सेतू अभियान’ राबविण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना, जनकल्याणकारी सुविधा आणि शासकीय सेवांची माहिती पोहोचवून त्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. मयुरेश भुजबळ, उपनगराध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती श्री. सदाशिव हेंदर पाटील, नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे, नगरसेविका सौ. मिना वाळेकर, नगरसेविका सौ. मिनू सिंग, शक्तिकेंद्र प्रमुख सौ. स्वप्नाली शिंदे, अंबरनाथ शहर उपाध्यक्ष सौ. श्रद्धा गुंजाळ, महिला उपाध्यक्ष सौ. छाया निकम, कल्याण जिल्हा भाजपा सचिव व अंबरनाथ विधानसभा प्रभारी श्री. दिलीप कणसे, अंबरनाथ विस्तारक श्री. पांडुरंग भोसले, अंबरनाथ शहर पश्चिम मंडळ ९ अध्यक्ष श्री. लक्ष्मणदत्त पंत, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. दिपक कोतेकर, समाजसेवक श्री. भरत फुलोरे, श्री. चैतन्य कोतेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷