सूर्योदय सभागृह, अंबरनाथ येथे अंबरनाथ समन्वय प्रतिष्ठान आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व महिला भगिनींना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नवरात्रोत्सवानिमित्त महिलांच्या आनंदाला, एकतेला आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारा ‘नमो महाभोंडला’ हा उपक्रम महिलांच्या उत्साहाचा आणि संस्कृतीच्या जतनाचा सुंदर संगम ठरला.
यावेळी महामंत्री, भाजपा महाराष्ट्र तथा आमदार, विधानपरिषद महाराष्ट्र राज्य आणि संचालिका, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, भारत सरकार सौ. माधवी नाईक, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. रुपाली लठ्ठे, कल्याण जिल्हा अंगणवाडी सहयोजिका तथा नगरसेविका सौ. सुजाता भोईर, नगरसेविका सौ. ज्योत्स्ना भोईर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. अर्चना सूर्यवंशी उपस्थित होत्या.
या सुंदर उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अंबरनाथ समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संजय आदक व माजी नगरसेविका सौ. अनिता आदक यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷