Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

13 Oct 2026

6 linked posts
गावदेवी नवरात्रौत्सव Reel

गावदेवी चौक, अंबरनाथ पश्चिम येथे गावदेवी उत्सव समिती आयोजित भव्य नवरात्रोत्सवात सहभागी होण्याचा योग आला.

भक्ती, संस्कृती आणि उत्साहाचा सुंदर संगम असलेल्या या नवरात्रोत्सवात आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या भव्य उत्सवाचे आयोजन केल्याबद्दल गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. पवन वाळेकर व नगरसेविका सौ. मीना वाळेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

सेवा संकल्प अभियान आरोग्य शिबिर Photos

अंबरनाथ नगरपरिषद आयोजित सेवा संकल्प अभियानांतर्गत फोर्टिस हॉस्पिटलच्या माध्यमातून अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात पालिकेतील कर्मचारी व कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी (Visitors) आरोग्य तपासणी शिबिर पार पडले

या शिबिरामध्ये रक्तदाब (BP), BMI आणि Random Blood Sugar तपासणी तसेच डॉक्टरांच्या कन्सल्टन्सीवर विशेष सवलत देणारी कूपन्सही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

या उपक्रमाचा उद्देश आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय उद्घाटन कार्यक्रम Photos

अंबरनाथ नगरपरिषद नगरसेविका सौ. सुजाता दिलीप भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवगंगा नगर येथे सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना दररोज वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध होणार असून, वाचनाची आवड जोपासण्यास तसेच सामाजिक आणि शैक्षणिक जाणीव वाढविण्यास मदत होणार आहे.

या विशेष प्रसंगी सौ. सुजाता दिलीप भोईर यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, यश व जनसेवेच्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेविका सौ. मिना वाळेकर, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सुप्रिया कदम, समाजसेवक श्री. दिलीप भोईर आणि सौ. चंदा गान उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नवरात्री उत्सव देवी चंद्रघंटा / कल्पना चावला Video

माता चंद्रघंटेची दिव्य शक्ती आणि कल्पना चावला यांचं आकाशाला गवसणी घालणारं स्वप्न!

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता चंद्रघंटा या शौर्य, धैर्य आणि निर्भयतेचं प्रतीक आहेत.

माता चंद्रघंटेच्या मस्तकावरील चंद्रापासून प्रेरणा घेत, आकाशाच्या पलीकडे झेप घेण्याचं स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या कल्पना चावला यांचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

माता चंद्रघंटा Graphic

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता चंद्रघंटा देवीला कोटी कोटी वंदन!

दहा हातांमध्ये विविध शस्त्रे धारण केलेली आणि सिंहावर आरूढ असलेली माता चंद्रघंटा ही शौर्य, शक्ती, धैर्य आणि निर्भयतेचे प्रतीक मानली जाते. तिचे दिव्य रूप भक्तांना शांती आणि दुष्ट शक्तींविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते.

आई चंद्रघंटा, सर्वांच्या जीवनातील संकटे दूर करून सुख, शांती आणि समृद्धी प्रदान करो.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

गावदेवी मंदिर महाआरती Photos

गावदेवी चौक येथे गावदेवी नवरात्र उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गावदेवी मातेच्या महाआरती सोहळ्याला उपस्थित राहण्याचे सौभाग्य लाभले.

यावेळी गावदेवी मातेची मनोभावे आरती करून सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. मातेच्या जयघोषाने आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने सोहळ्याची शोभा अधिकच वाढली. या मंगलमय प्रसंगी नगरसेविका सौ. मिना वाळेकर, सौ. गीता दामसे व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद