Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

08 Oct 2026

5 linked posts
सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा Photos

सेवा संकल्प अभियानांतर्गत आज पीएमएम रोटरी स्कूल, अंबरनाथ पूर्व येथे आयोजित चित्रकला स्पर्धेला भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, त्यांची सर्जनशीलता आणि सुंदर कलाकृती पाहण्याचा आनंद मिळाला.

विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कल्पनाशक्ती तसेच सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ. सॅव्हरिन डायस, स्कूल ॲडमिन सौ. सुरेखा तिवळे व चित्रकला शिक्षिका सौ. स्मिता राजे मॅडम उपस्थित होत्या.

तसेच गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजित गुलाबराव करंजुले पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव श्री. अजिंक्य कुलकर्णी, भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस श्री. दुर्गेश चव्हाण तसेच श्री. अनिल गायकवाड यांचीही उपस्थिती लाभली. या सुंदर उपक्रमासाठी शाळेच्या सर्व शिक्षकवर्गाचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

सेवा संकल्प अभियानांतर्गत रांगोळी प्रदर्शन Photos

महालक्ष्मी नगर येथे भारतीय जनता पार्टी, अंबरनाथ पूर्व मंडळाच्या वतीने, देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय व महाराष्ट्र राज्य नेतृत्वाच्या आदेशानुसार, अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

या प्रदर्शनानिमित्ताने अनुसूचित जाती अध्यक्षा श्रीमती ज्योती डोंगरे यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ‘Save Trees, Save Life’ या विषयावरील सुंदर रांगोळी साकारली. या रांगोळीच्या माध्यमातून ‘वृक्ष वाचवा, जीवन वाचवा’ तसेच पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.

यावेळी अंबरनाथ पूर्व शहर सचिव सौ. रिना मोरे, महिला मोर्चा युवती अध्यक्ष सौ. सुनीता लायल, समाजसेविका छकुली बनसोडे तसेच कार्यकर्ता सौ. भारती तायडे यांची उपस्थिती होती.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नाना पाटेकर श्रद्धांजली Graphic

सिनेसृष्टी आणि रंगभूमीचा नटसम्राट हरपला…

आपल्या अभिनयाने आणि अजरामर भूमिकांनी असंख्य रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कला क्षेत्रातील एक दैदिप्यमान पर्व आज संपले.

१ जानेवारी १९५१ – ८ ऑक्टोबर २०२६

मराठी मातीतून आलेल्या नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. हिंदी सिनेसृष्टीत एका मराठी कलाकाराने मिळवलेला मान-सन्मान आणि रसिकांच्या मनात निर्माण केलेले स्थान ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.

त्यांची अभिनयकला, अजरामर भूमिका आणि सिनेसृष्टी व रंगभूमीला दिलेले अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील. महान कलावंत, नटसम्राट नाना पाटेकर यांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

सेवा संकल्प अभियानांतर्गत नमो गाथा सादरीकरण Photos

भारतीय जनता पार्टी अंबरनाथ पूर्व मंडळाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘नमो गाथा’ या नाटकाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.

अंबरनाथ पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात झालेल्या या नाट्यप्रयोगातून नरेंद्रजी मोदी यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची, राष्ट्रसेवेची आणि जनकल्याणासाठीच्या कार्याची प्रेरणादायी गाथा नागरिकांसमोर मांडण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजक श्री. संतोष शिंदे आणि सहसंयोजक श्री. विजय सुर्वे यांचे मनःपूर्वक आभार तसेच यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन!

यावेळी नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे, महिला मोर्चा युवती अध्यक्ष सौ. सुनीता लायल, अनुसुचित जाती अध्यक्षा श्रीमती ज्योती डोंगरे, अंबरनाथ पूर्व शहर सचिव सौ. रिना मोरे, महिला मोर्चा सचिव सौ. हर्षदा सावंत, अंबरनाथ विधानसभा युवती अध्यक्ष ऐश्वर्या मोटे, BLO 1 अंबरनाथ विधानसभा श्री. संतोष शिंदे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

भारतीय वायुसेना दिन Graphic

आकाशाच्या सीमांचे रक्षण करत, मातृभूमीच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय वायुसेनेच्या शूर जवानांना भारतीय वायुसेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देशाच्या रक्षणासाठी धैर्य, शौर्य आणि समर्पणाची सर्वोच्च परंपरा जपणाऱ्या प्रत्येक वीर जवानाला मनःपूर्वक सलाम.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद