Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

07 Oct 2026

3 linked posts
सेवा संकल्प अभियानांतर्गत रांगोळी प्रदर्शन Reel

भारतीय जनता पार्टी, अंबरनाथ पूर्व मंडळाच्या वतीने देशाचे लाडके पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय व महाराष्ट्र राज्य नेतृत्वाच्या आदेशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

अंबरनाथ पूर्व मंडळ अध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्पर्धेत विकसित भारत 2047, आयुष्मान भारत अशा भारत सरकारच्या विविध योजना आणि मोदी सरकारच्या जनकल्याणकारी कामांवर आधारित आकर्षक रांगोळ्या साकारण्यात आल्या. महिलांनी विविध बूथवर अप्रतिम रांगोळ्या साकारून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

याप्रसंगी गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजित गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, मंडळ संयोजिका सौ. रीना मोरे,

सहसंयोजिका सौ. सुनीता लायल, भाजपा कार्यकर्त्या सौ. शिल्पा फुलोरे तसेच इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा Photos

अंबरनाथ पूर्व विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध वयोगटांनुसार विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रनिर्माणाशी संबंधित विषय देण्यात आले.

विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि कल्पकतेने सहभाग नोंदवत आपल्या चित्रांमधून भारताच्या उज्ज्वल भविष्याची सुंदर कल्पना साकारली. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार!

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा हा छोटासा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरला. यावेळी शहर उपाध्यक्ष श्री. मिलिंद गान तसेच युवा मोर्चा सचिव, अंबरनाथ पूर्व श्री. अजिंक्य कुलकर्णी उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

सेवा संकल्प अभियानांतर्गत स्वच्छता अभियान Reel

भारतीय जनता पार्टी, अंबरनाथ पूर्व मंडळाच्या वतीने देशाचे लाडके पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, केंद्रीय व महाराष्ट्र राज्य नेतृत्वाच्या आदेशानुसार सेवा संकल्प अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

अंबरनाथ पूर्व येथील अटल उद्यान येथे आयोजित या स्वच्छता अभियानाचे आयोजन अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

यावेळी बालकल्याण समिती सभापती तथा नगरसेविका सौ. स्वाती पाटील, नगरसेविका सौ. अनिता आदक, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, अंबरनाथ पूर्व शहर सचिव सौ. रिना मोरे, महिला मोर्चा युवती अध्यक्ष सौ. सुनीता लायल, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सुप्रिया कदम, महिला उपाध्यक्ष सौ. छाया निकम, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष सौ. आशा देशमुख, शहर सरचिटणीस सौ. वैशाली नलावडे, भाजपा कार्यकर्ता कृष्णबा शिसोदिया तसेच समाजसेवक श्री. भरत फुलोरे उपस्थित होते.

स्वच्छ, सुंदर आणि निरोगी अंबरनाथच्या निर्मितीसाठी अशा सेवा उपक्रमांमधून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद