अंबरनाथ शहरातील विविध अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अंगणवाडीतील लहान मुलांना पोषणयुक्त आहार वाटप करण्यात आले. तसेच मुलांच्या संगोपनात आणि पोषणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान करण्यात आला.
या उपक्रमादरम्यान बालकल्याण समिती सभापती तथा नगरसेविका सौ. स्वाती पाटील, नगरसेविका सौ. अश्विनी पाटील, नगरसेविका सौ. पायल सोरखडे, नगरसेवक श्री. मनेष गुंजाळ, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, नगरसेवक श्री. मनीष म्हात्रे, नगरसेवक श्री. सुनील वाघे, शक्तिकेंद्र प्रमुख सौ. दिपाली गुंजाळ, महिला मोर्चा युवती अध्यक्ष सौ. सुनीता लायल, अंबरनाथ पूर्व शहर सचिव सौ. रिना मोरे, अंबरनाथ पूर्व शहर सचिव सौ. सुरेखा शाह, महिला उपाध्यक्ष सौ. छाया निकम तसेच अंगणवाडी सेविका सौ. प्रमिला अरिवले, अंगणवाडी मदतनीस सौ. सुवर्णा तांबे उपस्थित होत्या.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷