तरुण भारत मित्र मंडळ आयोजित शारदीय नवरात्रोत्सव पाटपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून माझ्यासह नगरसेविका सौ. मीनाताई वाळेकर यांच्या हस्ते पाटपूजन करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. गणेश घोणे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अंबरनाथ पश्चिम अध्यक्ष श्री. सुभाष सरवदे, अनुसूचित जाती मोर्चा अंबरनाथ पश्चिम उपाध्यक्ष श्री. यश अनंत गायकवाड तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
आई जगदंबेच्या कृपेने हा नवरात्रोत्सव सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷