Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

04 Oct 2026

4 linked posts
पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र वर्धापन दिन सोहळा Photos

ब्राह्मण सभा मंगल कार्यालय, अंबरनाथ येथे पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ‘राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला.

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, साहित्य तसेच विविध क्षेत्रांत समाजसेवेचे व्रत घेऊन समाजाप्रती जागरूकतेने कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास कोकण विभाग शिक्षण मतदारसंघाचे आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, संस्थेचे मुख्य संपादक श्री. रमेश सनस, उपसंपादक श्री. अविनाश म्हात्रे, कार्यकारी संपादक श्री. शैलेश सनस, महिला बालकल्याण समिती सभापती तथा नगरसेविका सौ. स्वाती पाटील, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती सौ. रेश्मा गुडेकर, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, नगरसेविका तथा उपसभापती सौ. किरण चौबे, नगरसेविका सौ. रंजना कोतेकर, नगरसेवक श्री. सुभाष साळुंखे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील, तसेच अंबरनाथ शहर पश्चिम मंडळ-२ चे उपाध्यक्ष श्री. अंब्रेश गौडा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा हा सोहळा निश्चितच प्रेरणादायी ठरला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

पोषण पंधरवडा अभियान Reel

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पोषण पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अंबरनाथ पूर्व व अंबरनाथ पश्चिम परिसरातील विविध अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन बालकांच्या पोषण व आरोग्याची माहिती जाणून घेतली.

यावेळी बालकांना पोषणमूल्यांवर आधारित खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच बालकांच्या पोषणासोबतच त्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान करण्यात आला.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या सेवेला सन्मान देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या प्रसंगी महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ. अर्चना सूर्यवंशी, नगरसेविका सौ. मिनू सिंग, नगरसेविका सौ. मिना वाळेकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. पौर्णिमा जाधव तसेच महिला मोर्चा मंडळ-२ सरचिटणीस सौ. सारिका वाळुंज उपस्थित होत्या.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

innerwheel School आयोजित Fusion Fest Reel

Innerwheel School आयोजित ‘Fusion Fest 2026’ या सुंदर आणि नाविन्यपूर्ण फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या उत्साहाचा आणि त्यांच्या कलागुणांचा अनुभव घेता आला. यावेळी गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजित गुलाबराव करंजुले पाटील, अल्पना गुलाबराव करंजुले पाटील तसेच कल्याण जिल्हा भाजपा सचिव तथा अंबरनाथ विधानसभा प्रभारी श्री. दिलीप कणसे उपस्थित होते.

विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कल्पकतेचा, कौशल्याचा आणि कलागुणांचा सुंदर आविष्काराचे सादरीकरण केले. या फेस्टिवलच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःतील वेगळेपण दाखवण्याची संधी मिळाली. फक्त स्पर्धा नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी Fusion Fest 2026 हे एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. या सुंदर आयोजनासाठी Innerwheel School मधील सर्व शिक्षक, आयोजक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जागतिक प्राणी दिन Graphic

प्राणी हे केवळ निसर्गाचा एक भाग नाहीत, तर आपल्या पर्यावरणाचा समतोल राखणारे महत्त्वाचे घटक आहेत.

त्यांचे अस्तित्व टिकले, तरच निसर्गाची साखळी आणि आपले पर्यावरण सुरक्षित राहील. मुक्या जीवांप्रती संवेदनशीलता आणि माणुसकी जपणे हीच खरी काळाची गरज आहे.

जागतिक प्राणी दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! वन्यजीवांचे संवर्धन करूया आणि निसर्गाचा समतोल जपूया.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद