अंबरनाथ नगरपरिषद आयोजित भव्य नगराध्यक्षा वर्षा मॅरेथॉन २०२६ मध्ये मुले, युवक-युवती, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
या मॅरेथॉनमध्ये पुरुष व महिला खुला गट, १२ वर्षांखालील, १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक तसेच ठाणे जिल्हास्तरीय खुला गट पुरुष व महिला यांच्यासाठी १० कि.मी. आणि ठाणे जिल्हास्तरीय ज्येष्ठ नागरिकांसाठी २ कि.मी. धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. सहभागी स्पर्धकांना मेडल्स, बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
लोकनगरी ब्रिज, शिवमंदिर, फॉरेस्ट नाका, कुर्ला कॅम्प आणि शास्त्री हिंदी विद्यालय अशा विविध ठिकाणांहून धावपटूंनी हुतात्मा चौकापर्यंत धाव घेत या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि ‘व्यसनमुक्त युवा, सशक्त समाज’ हा संदेश घेऊन झालेल्या या मॅरेथॉनला मिळालेला प्रतिसाद खरोखरच उत्साहवर्धक होता.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷