माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पोषण पंधरवडा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अंबरनाथ पूर्व व अंबरनाथ पश्चिम मधील अंगणवाडी केंद्रांना भेट देत अंगणवाडीतील बालकांच्या पोषण व आरोग्याची माहिती जाणून घेतली. त्यांना पोषणावर आधारित खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या पोषणाची योग्य काळजी घेण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान करण्यात आला.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या ग्रामीण व शहरी भागातील बालकांच्या पोषण, आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यांच्या सेवेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याची दखल घेणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या प्रसंगी कल्याण जिल्हा अंगणवाडी सहयोजिका तथा नगरसेविका सौ. सुजाता भोईर, महिला व बालकल्याण समिती सभापती तथा नगरसेविका सौ. स्वाती पाटील, भाजपा कार्यकर्ता तथा बूथ अध्यक्ष सौ. श्वेता भोईर, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष सौ. रेश्मा भोईर, महिला मोर्चा सरचिटणीस अंबरनाथ पूर्व मंडळ सौ. सुप्रिया कदम, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष सौ. आशा देशमुख, अंबरनाथ पूर्व शहर सचिव सौ. रिना मोरे, महिला मोर्चा युवती अध्यक्ष सौ. सुनीता लायल तसेच भाजपा कार्यकर्ता सौ. माधुरी टेमकर, भाजपा कार्यकर्ता सौ. छाया निकम, भाजपा कार्यकर्ता सौ. शिल्पा फुलोरे उपस्थित होत्या.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷