Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

30 Apr 2026

7 linked posts
रुचिताताई निवासस्थान Photos

कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रुचिताताई राजेंद्र घोरपडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पवित्र सत्यनारायणाच्या पूजेत सहभागी होण्याचा योग आला. श्रीसत्यनारायण भगवान यांच्या चरणी प्रार्थना करून सर्वांच्या सुख-समृद्धी व उत्तम आरोग्यासाठी मंगल कामना करण्यात आली.

याप्रसंगी मुरबाड विधानसभेचे आमदार मा.श्री. किसनजी कथोरे साहेब यांचीही उपस्थिती लाभली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती Photos

अंबरनाथ नगरपरिषद आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत त्यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा.श्री. उमाकांत गायकवाड, उपनगराध्यक्ष मा.श्री. सदाशिव पाटील व अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच अंबरनाथ नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेला ग्रामविकास, स्वच्छता आणि समाजप्रबोधनाचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत, समाजहिताच्या कार्यात अधिक जोमाने योगदान देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

न्याय बंधू ॲप Graphic

सामान्य नागरिकांपर्यंत न्याय सहज आणि सुलभ पद्धतीने पोहोचावा, या उद्देशाने ‘न्याय बंधु’ हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. कायदेशीर प्रक्रियेची माहिती, मार्गदर्शन आणि मदत आता प्रत्येकाच्या हातात उपलब्ध होत आहे.

‘न्याय बंधु’ अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम बनवत, न्यायव्यवस्थेतील दरी कमी करण्याचा हा एक सकारात्मक आणि लोकाभिमुख प्रयत्न आहे. डिजिटल युगात न्याय मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

प्रत्येक नागरिकाने या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या हक्कांसाठी सजग राहावे. आजच ‘न्याय बंधु’ अ‍ॅप डाउनलोड करा.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती Graphic

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 🙏🏻

समाजप्रबोधन, ग्रामविकास आणि मानवतेचा संदेश देणारे महान संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ग्रामगीताच्या माध्यमातून त्यांनी स्वावलंबी, सुसंस्कृत आणि सशक्त समाजाची दिशा दाखवली.

त्यांच्या विचारांतून स्वच्छता, एकता, शिक्षण आणि नैतिक मूल्यांची जपणूक यांना विशेष महत्त्व दिले गेले. आजच्या काळातही त्यांचे विचार आपल्याला समाजसेवेची प्रेरणा देतात आणि जबाबदार नागरिक म्हणून पुढे जाण्याची शिकवण देतात.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

श्री नृसिंह जयंती Graphic

श्री नृसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻

भगवान श्री नृसिंहांनी भक्त प्रह्लादाचे रक्षण करून अधर्माचा नाश केला, त्या दिव्य शक्तीची आठवण करून देणारा हा पवित्र दिवस.

आपल्या जीवनातही सदैव सत्य, धैर्य आणि श्रद्धेचा विजय होवो, हीच प्रार्थना. नृसिंह भगवानांच्या कृपेने आपल्यावर व आपल्या कुटुंबावर सदैव सुख, समृद्धी आणि संरक्षण राहो!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

दादासाहेब फाळके जयंती Graphic

भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचणारे, स्वप्नांना रुपेरी पडद्यावर साकार करणारे आणि नव्या युगाची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ती एक क्रांती होती.

अडचणी, मर्यादा आणि संसाधनांच्या अभावावर मात करत त्यांनी भारतीय सिनेमाला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या दूरदृष्टीतून आणि अथक परिश्रमातून उभी राहिलेली ही सिनेमा संस्कृती आजही लाखो लोकांच्या स्वप्नांना दिशा देते.

दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन. त्यांची प्रेरणा आपल्याला सतत नवनिर्मितीची, धाडसाची आणि उत्कृष्टतेची दिशा दाखवत राहो.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

भारत टॅक्सी Graphic

नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले ‘भारत टॅक्सी’ हे एक डिजिटल व्यासपीठ असून देशभरातील लाखो चालकांना स्वावलंबनाकडे नेणारे शक्तिशाली माध्यम आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत, पर्यावरणपूरक आणि परवडणारी प्रवास सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा हा संकल्प आहे.

या उपक्रमामुळे चालकांना सुलभ कर्जसुविधा, मुद्रा कर्ज योजनांचा लाभ, तसेच ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडणार आहे.

डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि हरित भारत या तिन्ही संकल्पनांना बळ देत ‘भारत टॅक्सी’ हा उपक्रम देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. चला, एकत्र येऊन या परिवर्तनाच्या प्रवासाचा भाग बनूया!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद