Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
Sun

31 Mar 2026

3 linked posts
पाण्याची टाकी पाहणी Reel

उलन चाळ, बारकू पाडा व पालेगाव याठिकाणी नवीन पाण्याची टाकी बांधण्यासाठी प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

यावेळी नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणी जाणून घेतल्या व त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

तसेच या कामाला गती देत लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, याबाबतही स्पष्ट निर्देश देण्यात आले.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

महावीर जयंती कार्यक्रम Photo

अंबरनाथ येथील श्री वासुपुज्य स्वामी जैन मंदिर येथे भगवान महावीर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सुंदर आणि आध्यात्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला.

या प्रसंगी कार्यक्रमात सहभागी होत भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला. आत्मचिंतन, संयम आणि साधनेचा संदेश देणारा हा उपक्रम मनाला स्पर्शून गेला.

भगवान महावीरांच्या विचारांची प्रेरणा घेत, जीवन अधिक शांत, संयमी आणि सकारात्मक बनवण्याची नवी ऊर्जा मिळाली.

अशा प्रकारचे आध्यात्मिक कार्यक्रम आपल्या जीवनात नवचैतन्य निर्माण करतात, याची पुन्हा एकदा जाणीव झाली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

महावीर जयंती Graphic

अहिंसा, सत्य, संयम आणि त्याग यांचा अमूल्य संदेश देऊन संपूर्ण मानवजातीला शांतीचा मार्ग दाखवणारे भगवान महावीर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..🙏🏻

त्यांच्या शिकवणीमुळे मानवतेचा खरा अर्थ समजतो आणि जीवनात सदाचार, करुणा व सहनशीलतेचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

आपल्या सर्वांच्या जीवनात शांतता, संयम, सद्भावना आणि सकारात्मकता नांदो, हीच प्रार्थना…

सर्व जैन बांधवांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद