महिलांच्या कला, कौशल्य आणि उद्योजकतेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा ‘उडान फेस्ट – स्वप्नांना देऊया भरारी’ हा भव्य उपक्रम अंबरनाथकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. राज्य परिषद सदस्य मा. श्री. गुलाबराव करंजुले पाटील तसेच सौ. सुनीता गुलाबराव करंजुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून उडान फेस्टचे उद्घाटन करण्यात आले.
महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ पश्चिम येथे २२ व २३ ऑगस्ट रोजी आयोजित या प्रदर्शनातून महिला उद्योजिका, कलाकार आणि व्यावसायिक महिलांना आपल्या कर्तृत्वाला नवी ओळख देण्याची आणि व्यवसायाला नवी संधी मिळवून देण्याची संधी मिळाली. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलत, महिलांच्या स्वप्नांना बळ देण्याचा आणि त्यांना स्वावलंबनाची नवी दिशा देण्याचा हा छोटासा प्रयत्न होता.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. नंदू परब, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक तथा नियोजन व विकास समिती सभापती श्री. महेश फुलोरे, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नगरसेविका सौ. अमृता मोहोरीकर, नगरसेविका सौ. रोहिणी भोईर, नगरसेविका सौ. शामला माणचेकर, नगरसेविका सौ. मिनू सिंग, सौ. चंदा गान, नगरसेविका सौ. ज्योत्स्ना भोईर, विभाग प्रमुख कानसाई श्री. चंद्रकांत भोईर, माजी नगरसेवक श्री. पंकज पाटील, नगरसेविका सौ. हर्षदा पाटील, विधानसभा संघटक सौ. अनिता लोटे यांची उपस्थिती लाभली.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷