Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

23 Aug 2026

4 linked posts
उडान फेस्ट भव्य प्रदर्शन Reel

महिलांच्या कला, कौशल्य आणि उद्योजकतेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा ‘उडान फेस्ट – स्वप्नांना देऊया भरारी’ हा भव्य उपक्रम अंबरनाथकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. राज्य परिषद सदस्य मा. श्री. गुलाबराव करंजुले पाटील तसेच सौ. सुनीता गुलाबराव करंजुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून उडान फेस्टचे उद्घाटन करण्यात आले.

महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ पश्चिम येथे २२ व २३ ऑगस्ट रोजी आयोजित या प्रदर्शनातून महिला उद्योजिका, कलाकार आणि व्यावसायिक महिलांना आपल्या कर्तृत्वाला नवी ओळख देण्याची आणि व्यवसायाला नवी संधी मिळवून देण्याची संधी मिळाली. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलत, महिलांच्या स्वप्नांना बळ देण्याचा आणि त्यांना स्वावलंबनाची नवी दिशा देण्याचा हा छोटासा प्रयत्न होता.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. नंदू परब, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक तथा नियोजन व विकास समिती सभापती श्री. महेश फुलोरे, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, महिला मोर्चा अध्यक्ष (अंबरनाथ पूर्व) सौ. कंचन मिश्रा, महिला मोर्चा अध्यक्ष (अंबरनाथ पश्चिम) सौ. पौर्णिमा जाधव, नगरसेविका सौ. अमृता मोहोरीकर, नगरसेविका सौ. रोहिणी भोईर, नगरसेविका सौ. शामला माणचेकर, नगरसेविका सौ. मिनू सिंग, सौ. चंदा गान, नगरसेविका सौ. ज्योत्स्ना भोईर, विभाग प्रमुख कानसाई श्री. चंद्रकांत भोईर, माजी नगरसेवक श्री. पंकज पाटील, नगरसेविका सौ. हर्षदा पाटील, विधानसभा संघटक सौ. अनिता लोटे यांची उपस्थिती लाभली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

उडान फेस्ट भव्य प्रदर्शन Photos

गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व जीबीके ग्रुप यांच्या सौजन्याने रक्षाबंधनानिमित्त आयोजित ‘उडान फेस्ट – स्वप्नांना देऊया भरारी’ हे भव्य प्रदर्शन अंबरनाथकरांच्या उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसादात पार पडले.

महिलांच्या कला, कौशल्य, मेहनत आणि उद्योजकतेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल या उपक्रमाच्या माध्यमातून उचलण्यात आले. महिलांनी स्वबळावर उभे राहावे, त्यांच्या व्यवसायाला आणि कलागुणांना बाजारपेठ मिळावी आणि त्यांच्या स्वप्नांना नवी भरारी मिळावी, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. नंदू परब, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक तथा नियोजन व विकास समिती सभापती श्री. महेश फुलोरे, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नगरसेविका सौ. अमृता मोहोरीकर, नगरसेविका सौ. रोहिणी भोईर, नगरसेविका सौ. शामला माणचेकर, नगरसेविका सौ. मिनू सिंग, सौ. चंदा गान, नगरसेविका सौ. ज्योत्स्ना भोईर, विभाग प्रमुख कानसाई श्री. चंद्रकांत भोईर, माजी नगरसेवक श्री. पंकज पाटील, नगरसेविका सौ. हर्षदा पाटील, विधानसभा संघटक सौ. अनिता लोटे यांची उपस्थिती लाभली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Naadverse concert संगित मैफिल Photos

धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर, अंबरनाथ येथे ‘Naadverse – A Bhajan Concert’ या भक्तिमय संगीत मैफलीस उपस्थित राहून हा सुरेल अनुभव घेता आला. भक्तीभावाने भारलेले वातावरण, अप्रतिम संगीत आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या सादरीकरणाचा सुंदर संगम अनुभवता आला. हा कॉन्सर्ट खरोखरच अविस्मरणीय ठरला!

या भक्तिमय संगीत मैफलीचे आयोजन करणारे माझे सहकारी CA श्री. व्योमेश पाठक आणि CA श्री. कौशिक गाडा यांचे मनःपूर्वक अभिनंदन! यावेळी नगरसेवक श्री. निखिल चौधरी यांचीही उपस्थिती लाभली.

NaadVerseच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Meet Spalon Family salon opening ceremony Photos

अंबरनाथ (पूर्व) येथील Meet Spalon Family Salon च्या भव्य उद्घाटन समारंभ सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. 💐

महिला, पुरुष आणि लहान मुले अशा संपूर्ण कुटुंबासाठी विविध सौंदर्यसेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या या नव्या उपक्रमाला उत्तम यश लाभो आणि अंबरनाथकरांचा भरभरून प्रतिसाद मिळो, हीच सदिच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद