Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

22 Aug 2026

1 linked post
उडान फेस्ट उद्घाटन सोहळा Photos

महिलांच्या कला, कौशल्य आणि उद्योजकतेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या "उडान फेस्ट – स्वप्नांना देऊया भरारी"चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. 🌸

या उद्घाटनप्रसंगी राज्य परिषद सदस्य मा. श्री. गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ नगरपरिषद नगराध्यक्षा CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील तसेच सौ. सुनीता गुलाबराव करंजुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून उडान फेस्टचे उद्घाटन करण्यात आले.

महिलांच्या स्वप्नांना, मेहनतीला आणि कर्तृत्वाला नवी दिशा देणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. अंबरनाथकरांनो, उडान फेस्टला आवर्जून भेट द्या आणि महिला उद्योजिकांच्या कलेला, कौशल्याला व व्यवसायाला प्रोत्साहन देत खरेदीचा आनंद लुटा!

📍 महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ पश्चिम २२ व २३ ऑगस्ट, सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत..

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद