Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

21 Aug 2026

2 linked posts
नवीन भेंडीपाडा पाणीप्रश्न आंदोलन Photos

नवीन भेंडीपाडा येथील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नागरिकांनी पुकारलेल्या उपोषणस्थळी उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा सुरळीत करणे, नवीन पाईपलाईन व फ्लो मीटर बसवणे आणि पाणीचोरीवर कारवाई करणे या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागण्या मान्य करून आवश्यक कार्यवाही करण्याचे मान्य केल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी MJP उपविभागीय अधिकारी श्री. के. एम. शेकोकर, गटनेता व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक व बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, अंबरनाथ शहर पश्चिम मंडळ उपाध्यक्ष श्री. अंबरेश गौडा, नगरसेवक श्री. प्रदीप नाना पाटील, नगरसेवक श्री. विपुल पाटील, नगरसेवक श्री. किरण राठोड, नगरसेवक श्री. दिनेश गायकवाड, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, समाजसेवक श्री. चरण रासाळ, नगरसेवक श्री. मनीष गुंजाळ, नगरसेवक श्री. मनीष म्हात्रे, नगरसेवक श्री. सुनील वाघे, माजी नगरसेवक श्री. मिलिंद पाटील, नगरसेविका सौ. संगीता गायकर, नगरसेविका सौ. मिनू सिंग, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेविका व शिक्षण क्रीडा सांस्कृतिक कार्य समिती सभापती सौ. रेश्मा गुडेकर, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, नगरसेविका सौ. रोहिनी भोईर, नगरसेविका सौ. संजीवनी देवडे, नगरसेविका सौ. अर्चना रसाळ, नगरसेविका सौ. पुनम पाटील, नगरसेविका सौ. पायल सोरखडे, नगरसेविका सौ. रेश्मा सुर्वे, नगरसेविका सौ. तेजस्विनी पाटील, समाजसेवक श्री. बबलू सिंग तसेच समाजसेविका सौ. किसन गायकर उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

उडान फेस्ट Byte

गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व जीबीके ग्रुप यांच्या सौजन्याने रक्षाबंधन निमित्त "उडान फेस्ट - स्वप्नांना देऊया भरारी" हे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

📅 २२ व २३ ऑगस्ट 📍 महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ पश्चिम

महिलांच्या कला, कौशल्य आणि उद्योजकतेला हक्काचे व्यासपीठ देत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल! साडी, ज्वेलरी, रेडीमेड कलेक्शन, होम डेकोर, ब्युटी प्रॉडक्ट्स आणि बरंच काही… अंबरनाथकरांसाठी एक भव्य प्रदर्शन आणि आनंदाची पर्वणी!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद