Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

19 Aug 2026

4 linked posts
वृक्षारोपण कार्यक्रम Reel

अहिल्याबाई महिला विकास संस्था, अंबरनाथ यांच्या वतीने अंबरनाथ नगरपालिका संचालित माध्यमिक विद्यालय, मोरिवली येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी अंबरनाथ नगरपरिषद उपनगराध्यक्ष श्री. सदाशिव हेंदर पाटील तसेच अहिल्याबाई महिला विकास संस्था अध्यक्षा सौ. उषा पाटील, सचिव सौ. संघजा मेश्राम, उपाध्यक्ष सौ. सुनीता यादव, खजिनदार सौ. प्रियंका चिल्लाल तसेच ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. विनोद शेलार यांची उपस्थिती लाभली.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, “वृक्षारोपणातून हरित अंबरनाथ” या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

महिला संघटक बैठक Photos

अंबरनाथ येथील भाजपा कार्यालयात महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी यांच्या समवेत संघटक बैठक पार पडली. बैठकीत संघटनात्मक कार्याचा आढावा घेत आगामी उपक्रम, पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक नियोजन तसेच महिला कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा सौ. कंचन मिश्रा, महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ. नवीना मांजरेकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. पौर्णिमा जाधव यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. महिला शक्तीच्या सक्रिय सहभागातून संघटन अधिक सक्षम आणि बळकट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जागतिक छायाचित्रण दिन Graphic

शब्दांत मांडता न येणाऱ्या क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करून ते कायमस्वरूपी आठवणीत जपणाऱ्या सर्व छायाचित्रकार बंधू-भगिनींना जागतिक छायाचित्रण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📸

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

गोस्वामी तुलसीदास जयंती Graphic

ज्ञान, भक्ती आणि साहित्याचा अद्वितीय संगम घडविणारे, ‘रामचरितमानस’चे रचनाकार महाकवी गोस्वामी तुलसीदास यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻

त्यांच्या साहित्याने भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि मूल्यांची समृद्ध परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचली. त्यांच्या विचारांना व कार्याला मनःपूर्वक नमन! 💐

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद