अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात शहरातील विविध भागांतील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी व सूचनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. नागरिकांच्या प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करून त्यांचे प्रभावीपणे निराकरण व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
याप्रसंगी काही नागरिकांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच विविध कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका देत आगामी उपक्रमांसाठी निमंत्रित केले.
सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷