गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व जीबीके ग्रुप यांच्या सौजन्याने विश्वजीत एम्पायर, विश्वजीत पिंक सिटी व विश्वजीत हेरिटेज, अंबरनाथ पूर्व येथे आयोजित पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला.
या पवित्र सोहळ्यानिमित्त मंदिरांमध्ये विधिवत पूजा-अर्चा व कलशारोहण तसेच श्री गणेश व श्री दुर्गामातेच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या मंगल सोहळ्यामुळे परिसरात आध्यात्मिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री. किसन कथोरे, राज्य परिषद सदस्य तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. गुलाबराव करंजुले पाटील, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, गटनेते व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील, शहर उपाध्यक्ष श्री. मिलिंद गान, नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ. स्वाती पाटील, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, तसेच उत्तर भारतीय आघाडी सरचिटणीस श्री. रणजीत सिंग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
श्री गणराय व जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करून सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय भविष्यासाठी आशीर्वाद घेण्यात आले.
सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷