Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

15 Aug 2026

7 linked posts
अभ्यासिका व यशस्विनी भवन भूमिपूजन सोहळा Photos

शिवाजी नगर, अंबरनाथ येथे अभ्यासिका व यशस्विनी भवनाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगली व सोयीस्कर जागा उपलब्ध व्हावी, तसेच परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त सुविधा निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.

याप्रसंगी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगरसेवक श्री. मनीष गुंजाळ, नगरसेवक व बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, समाजसेवक श्री. संदीप लकडे, शहर उपाध्यक्ष श्री. दत्ताराम देशमुख, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. दीपक कोतेकर, माजी नगरसेवक श्री. पंकज पाटील, नगरसेविका व शिक्षण, क्रीडा सांस्कृतिक कार्य समिती सभापती सौ. रेश्मा गुडेकर, नगरसेविका सौ. मोनिका रिंचड, नगरसेविका सौ. पल्लवी लकडे, शक्ती केंद्र प्रमुख सौ. दिपाली गुंजाळ, अंबरनाथ पूर्व शहर सचिव सौ. सुरेखा शाह, महिला मोर्चा युती अध्यक्ष सौ. सुनीता लायल उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणाऱ्या आणि नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या सुविधेमुळे परिसराच्या विकासात निश्चितच भर पडेल.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

BGM INTL Church Anniversary कार्यक्रम Photos

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने BGM INTL Church यांच्या चर्च ॲनिव्हर्सरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला.

यावेळी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत, चर्चच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Art Competition Photos

अंबरनाथ येथील PMM Rotary School येथे Rotaract Club of Ambarnath यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय ‘ART Competition’ कार्यक्रमास उपस्थित राहून सहभागी विद्यार्थी, आयोजक व स्पर्धकांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख श्री. पुरुषोत्तम उगले तसेच नगरसेवक श्री. निखिल चौधरी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारे असे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

अंबरनाथ नगरपरिषद कार्यालय ध्वजारोहण Reel

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अंबरनाथ नगरपरिषद कार्यालय आवारात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राष्ट्रध्वजाला अभिवादन करताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेत अंबरनाथ शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष श्री. सदाशिव हेंदर पाटील, मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड, उपमुख्याधिकारी श्री. उमेश राऊत, लोकनेते, राज्य परिषद सदस्य तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. गुलाबराव करंजुले पाटील, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच अंबरनाथ नगरपरिषदेचे नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

हर घर तिरंगा Photos

भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनानुसार ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राहत्या घरी तिरंगा लावून देशाप्रतीचा अभिमान व्यक्त केला. 🇮🇳

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

पारशी नववर्ष शुभेच्छा Graphic

पारशी नववर्षाच्या सर्व पारशी बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

हे नववर्ष आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी, शांतता, उत्तम आरोग्य आणि आनंद घेऊन येवो. सर्वांमधील बंधुभाव आणि प्रेमाची भावना अधिक दृढ होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा. 🙏

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

भारतीय स्वातंत्र्य दिन शुभेच्छा Graphic

तिरंग्याच्या प्रत्येक रंगात अभिमान, शौर्य आणि त्यागाची कहाणी सामावलेली आहे! सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

डौलाने फडकणारा तिरंगा पाहताना प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना अधिक दृढ होते. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला विनम्र अभिवादन करत, राष्ट्राच्या प्रगतीसाठी नवी ऊर्जा आणि नवा संकल्प करूया.

भारत माता की जय! 🇮🇳 वंदे मातरम्!

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद