Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

14 Aug 2026

2 linked posts
शिवमंदिर पाहणी Reel

श्रावण महिन्यात अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात येणाऱ्या भाविकांची आणि कावड यात्रेकरूंची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आज प्राचीन शिवमंदिर परिसराची पाहणी करण्यात आली.

यावेळी मंडप व्यवस्था, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, वॉटर प्युरिफिकेशन, विद्युत व्यवस्था, रस्ते व्यवस्था तसेच घाट परिसर आणि धर्मशाळेच्या सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामांची सविस्तर पाहणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

श्रावण महिन्यात अंबरनाथमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित, स्वच्छ आणि उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी अंबरनाथ नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

यावेळी नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नगरसेविका सौ. पूनम राकेश पाटील, नगरसेविका सौ. मोनिका रिंजड, शहर अभियंता श्री. राजेश तडवी, पत्रकार श्री. गणेश गायकवाड तसेच समाजसेवक श्री जयराम पाटील उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

पतेती शुभेच्छा Graphic

येणारे पारशी नववर्ष सर्व पारशी बांधव-भगिनींच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि समाधान घेऊन येवो, तसेच सर्वांच्या जीवनात स्नेह व बंधुभाव वृद्धिंगत होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! पारशी बांधवांना पतेतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🙏🏻

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद