Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

13 Aug 2026

5 linked posts
भाजी मार्केट पुनर्वसन बैठक Photos

छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटच्या पुनर्विकासासाठी तयार करण्यात आलेला आराखडा संबंधितांसमोर सादर करून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच अंबरनाथमधील शासकीय विद्यालय व पोस्ट ऑफिसच्या पुनर्विकासाबाबत संबंधित शासकीय विभागाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली.

अंबरनाथमधील शाळा, बाजारपेठ आणि सार्वजनिक सुविधा अधिक चांगल्या, आधुनिक व नागरिकांसाठी उपयुक्त व्हाव्यात, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष श्री. सदाशिव हेंदर पाटील, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नगरसेवक तथा नियोजन व विकास समिती सभापती श्री. महेश फुलोरे तसेच व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री. खानजी धल उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जावसई व फुलेनगर उद्यान पाहणी Reel

फुलेनगर येथील उद्यानाची पाहणी करून उद्यानाचे काम दर्जेदार व नागरिकांच्या उपयोगाचे व्हावे, यासाठी आवश्यक सूचना करण्यात आल्या. तसेच जावसई येथील प्रस्तावित नमो उद्यानाच्या जागेची पाहणी करून विकासकामाबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी जावसई गाव, युवासेना विभाग प्रमुख श्री. चेतन किसन गायकर, समाजसेवक श्री. किसन गायकर, नगरसेविका सौ. संगीता गायकर, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नगरसेवक तथा नियोजन व विकास समिती सभापती श्री. महेश फुलोरे, माजी नगरसेवक श्री. मिलिंद पाटील, नगरसेवक श्री. दिनेश गायकवाड शहर अभियंता श्री. राजेश तडवी तसेच समाजसेवक श्री. संजय कांबळे उपस्थित होते.

फुलेनगर आणि जावसई परिसरातील नागरिकांना दर्जेदार, सुंदर व सुविधायुक्त उद्याने उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामांना योग्य दिशा देण्यावर यावेळी भर देण्यात आला.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे जयंती Graphic

विचार मांडण्याचे धैर्य आणि समाजहितासाठी संघर्ष करण्याची वृत्ती जपणारे थोर समाजसुधारक, साहित्यिक व विचारवंत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

आपल्या परखड लेखणीने आणि प्रभावी विचारांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनावर अमिट ठसा उमटविणाऱ्या आचार्य अत्रे यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी Graphic

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏🏻

लोककल्याण, न्यायप्रियता आणि धर्मरक्षणाचा आदर्श आपल्या कार्यातून निर्माण करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या विचारांचा आणि लोकसेवेचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा घेऊया.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

श्रावण मासारंभ शुभेच्छा Graphic

हर हर महादेव!

भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्या पावन आशीर्वादाने सुरू होणारा पवित्र श्रावण मास आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी घेऊन येवो, हीच महादेव चरणी प्रार्थना.

सर्व शिवभक्तांना पवित्र श्रावण मासारंभाच्या मंगलमय शुभेच्छा!

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद