Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

11 Aug 2026

2 linked posts
मागासवर्गीय समिती बैठक Photos

अंबरनाथ नगरपरिषदेच्या मागासवर्गीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक समितीचे सभापती तथा नगरसेवक श्री. कबीर नरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी समितीच्या सर्व सदस्यांसोबत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. अंबरनाथ शहराच्या विकासासह मागासवर्गीय समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आवश्यक मुद्दे मांडून त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी नगरसेवक श्री. संदीप भराडे, नगरसेवक श्री. दिनेश गायकवाड, पाणीपुरवठा विभागाचे श्री. सुनील जाधव, नगरसेविका सौ. पायल सोरखडे, नगरसेविका सौ. संजीवनी देवडे, नगरसेविका सौ. मोनिका रिंजड तसेच नगरसेविका सौ. रेश्मा सुर्वे उपस्थित होत्या.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

आंतरराष्ट्रीय युवा दिन शुभेच्छा Graphic

युवाशक्ती ही देशाच्या प्रगतीची खरी ताकद आहे. युवा पिढीच्या ऊर्जा, कल्पकता आणि कर्तृत्वातूनच सक्षम व विकसित भारताची निर्मिती होणार आहे.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सर्व युवा वर्गाला मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳✨

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद