Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

09 Aug 2026

7 linked posts
गोविंदा सराव शुभारंभ Photos

भास्कर नगर गोविंदा पथक, अंबरनाथ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोविंदा सराव शुभारंभ पूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी गोविंदा पथकातील सर्व तरुणांना आगामी सराव व दहीहंडी उत्सवासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रणविजय यादव यांचे अभिनंदन करून मनःपूर्वक आभार मानले.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

अतिरिक्त मुख्याधिकारी पदस्थापना Photos

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-११ अंतर्गत श्री. मयुरेश कैलास भुजबळ, परिविक्षाधीन मुख्याधिकारी, गट-अ यांची ऑन फील्ड ट्रेनिंग स्वरूपात अतिरिक्त मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद म्हणून पदस्थापना झाली आहे.

या निमित्ताने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. अंबरनाथ नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजात त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा निश्चितच लाभ होईल.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जागतिक आदिवासी दिन Reel

जागतिक आदिवासी दिनानिमित्त अंबरनाथ शहरातील विविध भागांना भेट देत आदिवासी बांधवांसोबत हा दिवस उत्साहात साजरा करण्याचा योग आला. आदिवासी ठाकूर समाज, अंबरनाथ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी होता आले. तसेच क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळाच्या वतीने आयोजित जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात देखील सहभागी होऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला.

यावेळी आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि जीवनशैलीची सुंदर अनुभूती घेता आली. पारंपरिक वेशभूषा, लोककला आणि पारंपरिक नृत्याच्या माध्यमातून आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले.

यावेळी गटनेते व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, अंबरनाथ शहर पश्चिम मंडळ-२ उपाध्यक्ष श्री. अंबरेश गौडा, अंबरनाथ शहर पश्चिम मंडळ-९ अध्यक्ष श्री. लक्ष्मणपंत दत्त, विधानसभा संघटक सौ. अनिता लोटे, जिल्हाध्यक्ष सौ. छाया वाघमारे, माजी नगरसेवक श्री. संदीप लोटे, सौ. गीता दामसे व श्री. पंकज म्हात्रे व अनेक नागरिक उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Right Choice उद्घाटन समारंभ Photos

अंबरनाथ शहरातील ‘Right Choice’ मेन्स वेअरच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून संचालकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. व्यवसायाची ही नवी सुरुवात यशस्वी ठरावी, ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळावा आणि ‘Right Choice’ची यशस्वी वाटचाल अधिकाधिक विस्तारावी, यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी नगरसेवक व नियोजन व विकास समिती सभापती श्री. महेश फुलोरे तसेच उल्हासनगर जिल्हाध्यक्ष भाजपा श्री. राजेश वधरिया देखील उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती Reel

धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह, अंबरनाथ पश्चिम येथे साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव २०२६ कमिटीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंती उत्सवात सहभागी होता आले.

यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान महिलांना साडी वाटप, विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक परिवर्तनाची भूमिका आजही समाजाला प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन निश्चितच प्रेरणादायी ठरते.

यावेळी अंबरनाथ नगरपरिषद उपनगराध्यक्ष श्री. सदाशिव हेंदर पाटील, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती पाटील, नगरसेवक तथा नियोजन व विकास समिती सभापती श्री. महेश फुलोरे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील तसेच इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जागतिक आदिवासी दिन Graphic

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या हक्कांचे, परंपरांचे आणि संस्कृतीचे जतन होण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहूया.

आदिवासी समाज हा आपल्या देशाच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण करत निसर्गाशी समतोल साधणाऱ्या आदिवासी बांधवांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहिले आहे.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

क्रांतिदिन शुभेच्छा Graphic

क्रांतीच्या ज्वालांनी स्वातंत्र्याचा दीप प्रज्वलित करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांना शतशः नमन!

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीला विनम्र अभिवादन. त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेत राष्ट्रहित, एकता आणि देशसेवेचा संकल्प करूया. 🇮🇳

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद