Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

08 Aug 2026

3 linked posts
वनमंत्री श्री. गणेश नाईक भेट Photos

अंबरनाथ शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर माननीय वनमंत्री श्री. गणेश नाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शहराच्या भविष्यातील गरजा, नागरिकांच्या सुविधा आणि विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.

अंबरनाथच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबींना सहकार्य मिळावे आणि प्रलंबित विषयांवर योग्य ती कार्यवाही व्हावी, यासाठी माननीय वनमंत्री महोदयांकडे सकारात्मक पाठपुरावा करण्यात आला.

यावेळी गटनेते व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, शक्ती केंद्र प्रमुख सौ. स्वप्नाली शिंदे, BLO-1 अंबरनाथ विधानसभा श्री. संतोष शिंदे तसेच अंबरनाथ पश्चिम मंडळ-९ अध्यक्ष श्री. लक्ष्मणदत्त पंत उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

ठाणे जिल्हा योगासन अजिंक्यपद स्पर्धा व राज्य निवड चाचणी स्पर्धा Reel

कानसई सेक्शन, अंबरनाथ (पूर्व) येथे योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, ठाणे जिल्हा यांच्या वतीने आयोजित ७वी ठाणे जिल्हा योगासन अजिंक्यपद स्पर्धा व राज्य निवड चाचणी २०२६-२७ या स्पर्धेच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात आले.

योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढविणारे प्रभावी माध्यम आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

यावेळी TDS अध्यक्ष श्री. प्रभाकर दुबे, TDS सचिव श्री. राजेश पवार, TDS उपाध्यक्ष श्री. अभय कबरा, स्पर्धा प्रमुख श्री. श्रीकांत शेलार, BPV प्रिन्सिपल सौ. मनिषा हांडे, पंचकोशाधारीत गुरुकुल हेड सौ. अश्विनी करजगी, SHV स्कूल प्रिन्सिपल सौ. वैशाली दुबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

हर घर तिरंगा अभियान Graphic

हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या अभियानात सहभागी व्हा, तिरंग्यासोबत सेल्फी काढा आणि harghartiranga.com वर अपलोड करून #SelfieWithTiranga द्वारे देशभक्तीचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा.

चला, आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला कृतज्ञ अभिवादन करूया! 🇮🇳

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद