Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

07 Aug 2026

1 linked post
कामगार भांडे किट वाटप Reel

भारतीय जनता पार्टी, अंबरनाथ शहर आयोजित महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या माध्यमातून श्रीमती ज्योती कालिदास डोंगरे यांच्या प्रयत्नातून कामगारांना भांड्यांचे किट वाटप तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला.

या कार्यक्रमामध्ये कामगारांना भांड्यांचे किट वितरित करण्यात आले तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती तसेच इतर शासकीय सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ तसेच महिला, कामगार बांधव आणि नागरिक उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद