Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

06 Aug 2026

4 linked posts
छत्री वाटप कार्यक्रम Photos

शिवगंगा नगर योगा केंद्र येथे समाजसेवक श्री. दिलीप जगन्नाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे सुंदर आयोजन करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ पुरुषांना मोफत छत्री वाटप, ज्येष्ठ महिलांना बॅग (पर्स) वाटप तसेच दहावी व बारावीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.

हा समाजपयोगी उपक्रम यशस्वीरीत्या आयोजित केल्याबद्दल अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. सुजाता ताई दिलीप भोईर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

यावेळी गटनेते व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, समाजसेवक श्री. दिलीप जगन्नाथ भोईर, नगरसेविका तथा आगरी सेना तालुका अध्यक्षा सौ. सुजाता भोईर, भाजपा महिला कल्याण जिल्हाध्यक्ष सौ. अर्चना सूर्यवंशी, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. कंचन मिश्रा, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेविका सौ. मिनू सिंह, नगरसेविका सौ. रंजना कोतेकर, अंबरनाथ शहर सरचिटणीस सौ. कुसुम रोहिदास, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सुनीता सिंग, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सुप्रिया कदम, महिला मोर्चा सचिव सौ. पुष्पा मोभारकर, अंबरनाथ पूर्व सचिव सौ. रिना मोरे तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

हर घर तिरंगा अभियान बैठक Photos

भाजपा कार्यालय अंबरनाथ येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने "हर घर तिरंगा" अभियान तसेच संघटन बैठक पार पडली. यावेळी आगामी अभियानाची रूपरेषा, संघटन बळकटीकरण तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीस कल्याण जिल्हाध्यक्ष श्री. नंदू परब, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक व गटनेते श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस श्री. निखिल चव्हाण, कल्याण जिल्हा संघटन सरचिटणीस श्री. रवी ठाकूर, अंबरनाथ शहर विस्तारक श्री. पांडुरंग भोसले, कल्याण जिल्हा भाजप सचिव तथा अंबरनाथ विधानसभा प्रभारी श्री. दिलीप कणसे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. कंचन मिश्रा, नगरसेविका सौ. रंजना कोतेकर, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती पाटील, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, नगरसेवक तथा नियोजन व विकास समिती सभापती श्री. महेश फुलोरे, अंबरनाथ सहसंयोजक श्री. अनिल गायकवाड, नगरसेवक श्री. सुनील वाघे तसेच नगरसेवक श्री. मनेष गुंजाळ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. दिपक कोतेकर, अंबरनाथ शहर उपाध्यक्ष श्री. किशोर सोरखडे, युवा अध्यक्ष श्री. अतिश पाटील, BLO-1 अंबरनाथ विधानसभा श्री. संतोष शिंदे, उद्योग आघाडी अध्यक्ष श्री. समीर नागे, कामगार आघाडी अध्यक्ष श्री. बापूसाहेब शिंदे, अंबरनाथ शहर उपाध्यक्ष श्री. राजेश पांडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणेबाबत बैठक Photos

अंबरनाथ शहरातील नागरिकांना अधिक सक्षम व सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयोजित महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत शहरातील आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

अंबरनाथकरांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील असून, प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम वैद्यकीय सुविधा पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

याप्रसंगी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, उपनगराध्यक्ष श्री. सदाशिव पाटील, आरोग्य अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, नागरी आरोग्य केंद्र (खुंटवली विभाग) येथील वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती Graphic

भारतीय जनसंघाचे संस्थापक, राष्ट्रनिष्ठ विचारांचे प्रणेते, आदरणीय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌺

राष्ट्राची एकता, अखंडता आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेले अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे राष्ट्रप्रेम, दूरदृष्टी, धैर्य आणि लोकसेवेचा आदर्श प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद