Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

03 Aug 2026

1 linked post
क्रांतिसिंह नाना पाटील जयंती Photos

आज अंबरनाथ नगरपरिषद आवारात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे अतुलनीय योगदान, राष्ट्रनिष्ठा आणि जनतेसाठी केलेला संघर्ष हा आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श समाजाला सदैव दिशा देत राहील.

यावेळी उपमुख्याधिकारी श्री. उमेश राऊत, आरोग्य विभागाचे श्री. राजेश शिंदे, अभिलेख (रिपॉझिटरी) विभागाचे श्री. स्वप्निल जाधव, सामान्य प्रशासन विभागाच्या सौ. विजया बंडगर तसेच लेखा विभागाचे श्री. प्रवीण वडगये उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद