हिंदू युवा वाहिनी महाराष्ट्र आयोजित भव्य कावड पदयात्रेचे स्वामी समर्थ चौक, अंबरनाथ येथे मनःपूर्वक स्वागत करून शिवभक्त कावड भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
श्रीक्षेत्र कोंडेश्वर महादेव मंदिर, बदलापूर येथून प्राचीन शिवमंदिर, अंबरनाथ येथे निघालेल्या या पवित्र पदयात्रेत सहभागी झालेल्या शिवभक्तांचा उत्साह, श्रद्धा आणि भगवान महादेवांप्रती असलेली अखंड भक्ती प्रेरणादायी होती.
यावेळी माजी नगराध्यक्ष श्री. गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक व गटनेते श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेविका व महिला बालकल्याण सभापती सौ. स्वाती पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील, महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सौ. रुपाली लठ्ठे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. कंचन मिश्रा, अंबरनाथ शहर पूर्व सचिव सौ. रीना मोरे, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, अंबरनाथ शहर सरचिटणीस श्री. राजेंद्र कुलकर्णी, अंबरनाथ शहर उपाध्यक्ष श्री. राजेश पांडे, कामगार आघाडी अध्यक्ष श्री. बापू शिंदे, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सुनीता सिंग, अंबरनाथ पश्चिम मंडळ अध्यक्ष श्री. लक्ष्मणदत्त पंत, व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री. खानजी धल, महिला मोर्चा युती अध्यक्षा सौ. सुनीता लायल, महिला मोर्चा सचिव सौ. मीना सिंग, भाजप कार्यकर्ता श्री. कृष्णबा शिसोदिया तसेच भाजप कार्यकर्त्या सौ. मंजू धल उपस्थित होते.
सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷