अंबरनाथ शहराच्या नियोजनबद्ध, सुयोग्य आणि विकासाच्या दृष्टीने टाऊन प्लॅनिंग विभागासोबत विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून विकास आराखड्याशी संबंधित बाबींचा आढावा घेण्यात आला.
यावेळी रेल्वे ओव्हरब्रिज, कानसई, वडवली मार्केट, ग्रीन सिटी, मोरवली गार्डन, बुवापाडा आदी परिसरांना भेट देऊन स्थानिक परिस्थिती तसेच भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पाहणी करण्यात आली.
याप्रसंगी नगरसेवक व गटनेते श्री. अभिजीत गुलाबराव पाटील यांनी टाऊन प्लॅनिंग विभागाच्या सौ. निकिता बांगे, नगरसेवक व नियोजन व विकास समिती सभापती श्री. महेश फुलोरे, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य व भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष श्री. पवन वाळेकर, कामगार आघाडी अध्यक्ष श्री. बापू शिंदे, व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री. खानजी धल, भाजपा शहर उपाध्यक्ष श्री. दत्ता देशमुख, नगरसेविका सौ. अमृता मोहोरीकर, नगरसेविका सौ. पायल सोरखडे, माजी नगरसेवक श्री. भरत फुलोरे, अंबरनाथ शहर उपाध्यक्ष श्री. राजेश पांडे, अंबरनाथ शहर पश्चिम उपाध्यक्ष श्री. अंबरेश गौडा, समाजसेवक श्री. अजय मोहोरीकर, समाजसेवक श्री. सचिन मंचेकर उपस्थित होते.
सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷