Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

31 May 2026

5 linked posts
नामकरण सोहळा Photos

नेरूळ, नवी मुंबई येथे सौ. सायली अक्षय सर्वगोड यांच्या कन्येच्या नामकरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. या आनंददायी आणि मंगल प्रसंगी चिमुकलीला मनःपूर्वक शुभाशीर्वाद देत तिच्या उज्ज्वल, निरोगी आणि यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

सुनील झुंझारराव सेवापूर्ती सोहळा Photos

चामटोली, बदलापूर येथे FNPO मान्यताप्राप्त पोस्टल फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुनील पांडुरंग झुंजारराव यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. भारतीय डाक विभागात तब्बल 40 वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने व उल्लेखनीय सेवा बजावत आज दिनांक ३१ मे २०२६ रोजी पोस्टमन पदावरून सेवानिवृत्त होत आहेत.

त्यांच्या दीर्घ सेवाकाळात त्यांनी नागरिकांशी जपलेला स्नेह, कार्यातील शिस्त आणि सेवाभाव हा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. यावेळी त्यांचा यथोचित सत्कार करून पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद व दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

राजू भगवान उबाळे सेवानिवृत्ती समारंभ Photos

कम्युनिटी हॉल, अंबरनाथ येथे आयु. राजू भगवान उबाळे यांच्या सेवानिवृत्ती गौरव समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक वर्षे निष्ठेने केलेल्या सेवेसाठी त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि यश लाभो.

याप्रसंगी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले-पाटील, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगरसेविका सौ. मीना वाळेकर तसेच अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जनार्दन जयराम मगर सेवानिवृत्त समारंभ Photos

चिखलोली पाडा, अंबरनाथ येथे अंबरनाथ नगरपरिषद आरोग्य विभागाचे श्री. जनार्दन जयराम मगर यांच्या सेवानिवृत्ती गौरव समारंभाला उपस्थित राहता आले. सार्वजनिक आरोग्य विभागात निष्ठेने व समर्पित भावनेने कार्य करत नागरिकांच्या सेवेसाठी योगदान देणाऱ्या श्री. जनार्दन मगर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

त्यांच्या सेवाकाळातील कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगरसेवक श्री. शैलेश भोईर उपस्थित होते

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती Graphic

लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, दूरदृष्टी आणि जनसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 🙏🏻

सामाजिक समता, महिला सक्षमीकरण आणि प्रजाहितासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद