Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

28 May 2026

8 linked posts
पाहणी Reel (अंबरनाथ पश्चिम)

अंबरनाथ पश्चिम परिसरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. पवन वाळेकर, नगरसेविका सौ. मिनू सिंग, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेविका सौ. वैशाली थेटे, नगरसेविका सौ. संगीता किसन गायकर, नगरसेवक श्री. उमेश पाटील, नगरसेविका सौ. रोहिणी भोईर व नगरसेवक श्री. शैलेश भोईर उपस्थित होते. पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच ज्या ठिकाणी अतिरिक्त उपाययोजनांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तत्काळ कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

अंबरनाथ शहर स्वच्छ, सुरक्षित आणि पावसाळ्यास पूर्णपणे सज्ज राहावे यासाठी नगरपरिषद प्रशासन सातत्याने कार्यरत असून नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देत आवश्यक ती सर्व कामे करण्यात येत आहेत.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷 Approved Posted https://www.instagram.com/reel/DY7RgCGIcIl/?igsh=OXliMmRxYWl0amU0 https://fb.watch/Hpolg0V6BI/?

30-May-2026 Insta/facebook

गणेश चाळ पाहणी Reel

1 Reel अंबरनाथ येथील गणेश चाळ, महालक्ष्मी नगर येथे नागरिकांनी सौ छाया निकम यांच्या मार्फ़त दिलेल्या निवेदनाची दखल घेत परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी गटारे, सार्वजनिक शौचालय, ड्रेनेज व्यवस्था तसेच रस्त्यांची पूर्व पाहणी करण्यात आली.

नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्यांची सविस्तर माहिती घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना व आवश्यक निर्देश देण्यात आले. नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध व्हाव्यात आणि परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷 Approved Posted https://www.instagram.com/reel/DY9viZhIKhY/?igsh=dTkxNTJ4Z3l4NjJz https://fb.watch/HqERqYeUT3/?

30-May-2026 Insta/facebook

अंबरनाथ पश्चिम पाहणी Reel 1 Reel पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरातील पश्चिम व पूर्व भागांमध्ये संबंधित अधिकारी व स्थानिक नागरिकांसमवेत नालेसफाई, जलनिस्सारण व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधांची पूर्व पाहणी करण्यात आली. यावेळी मा. नगरसेवक भरत फुलोरे, नगरसेविका सौ. संगीता गायकर व आरोग्य प्रमुख श्री महेश तायडे देखील उपस्थित होते.

यावेळी संभाव्य अडचणींचा आढावा घेऊन आगामी नालेसफाई व आवश्यक कामे वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण व्हावीत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण मिळावे, यासाठी प्रशासन सातत्याने कार्यरत आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷 Approved Posted https://www.instagram.com/reel/DY9zmZPIEVF/?igsh=ampqczR1YjgxamFk https://fb.watch/HqGFK2S8DR/? (Pink saree)
30-May-2026 Insta/facebook

अंबरनाथ शहर पाहणी Reel 1 Reel अंबरनाथ शहरातील पश्चिम भागांमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई व जलनिस्सारण व्यवस्थेची पूर्व पाहणी करण्यात आली. यावेळी नगरसेविका सौ. मीना वाळेकर व आरोग्य प्रमुख श्री महेश तायडे देखील उपस्थित होते.

नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी विविध ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण मिळावे, यासाठी प्रशासन सातत्याने कार्यरत आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷 Approved Posted https://www.instagram.com/reel/DY92LSvo2nd/?igsh=bGNuM3FjcjR5cGcz https://fb.watch/HqI0sgMv19/?

(Black Dress)
30-May-2026 Insta/facebook

मोदीजी Graphic

1 Graphic

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राष्ट्रनिर्मितीची १२ वर्षे!

राष्ट्र प्रथम" या विचाराला केंद्रस्थानी ठेवून गेल्या १२ वर्षांत भारताने विकास, सुशासन, सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने अभूतपूर्व प्रगती साधली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाने जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण करत प्रत्येक भारतीयाचा आत्मविश्वास अधिक बळकट केला आहे.

डिजिटल इंडिया, आधुनिक पायाभूत सुविधा, सक्षम संरक्षण व्यवस्था, गरीब कल्याण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भारत आज विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. देशहित सर्वोपरि मानत जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवणाऱ्या या १२ वर्षांच्या यशस्वी प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷 #namo@12

अस्थमा Treatment Camp Graphic

श्वसनासंबंधित त्रासाने ग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक उपक्रम म्हणून हैदराबाद येथील जगप्रसिद्ध आयुर्वेदिक अस्थमा उपचाराचा मोफत कॅम्प मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आला आहे.

लोकनेता, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य तसेच अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विशेष उपक्रमामध्ये नागरिकांना मोफत आयुर्वेदिक अस्थमा उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मोफत नोंदणीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.

हा कॅम्प जीबीके ग्रुप, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबरनाथ पूर्व येथे सकाळी 7:30 ते सायंकाळी 7:30 या वेळेत पार पडणार असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या मोफत उपचाराचा लाभ घ्यावा.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

श्वानप्रेमी बैठक

आज अंबरनाथ नगरपरिषदेत श्वानप्रेमी नागरिकांसोबत बैठक पार पडली. यावेळी शहरातील भटक्या श्वानांबाबत विविध समस्या, सूचना तसेच प्राणी संवर्धनाशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

श्वानप्रेमींनी मांडलेल्या सूचनांची दखल घेत, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आल्या असून योग्य ती मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.

प्राणीमात्रांप्रती जिव्हाळा आणि संवेदनशीलता कायम ठेवत, नागरिकांच्या सहकार्याने भटक्या श्वानांच्या संरक्षण व व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यास अंबरनाथ नगरपरिषद सकारात्मक पावले उचलत आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

वरद speciality clinic opening Photos

अंबरनाथ पूर्व येथे वरद स्पेशलिटी क्लिनिक च्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून आरोग्यसेवेच्या क्षेत्रात सुरू झालेल्या या नवीन उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. नागरिकांना उत्तम व दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी हे क्लिनिक निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.💐

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहता आले. तसेच नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

आधुनिक सुविधा, योग्य उपचार आणि रुग्णांप्रती संवेदनशीलता यांमुळे हे क्लिनिक नागरिकांचा विश्वास संपादन करेल, यात शंका नाही. स्थानिक नागरिकांच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती Photos

आज अंबरनाथ नगरपरिषद आवारात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अंबरनाथ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. सदाशिव पाटील देखील उपस्थित होते

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान, क्रांतिकारी विचार आणि ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षामुळे त्यांना “वीर” ही उपाधी मिळाली. देशभक्ती, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सदैव प्रेरणादायी राहतील. अखंड राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष यामुळे सावरकरांचे कार्य आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहे.🇮🇳

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

विनायक दामोदर सावरकर जयंती व्हिडिओ

“ने मजसी ने परत मातृभूमीला…” या ओळींमधून मातृभूमीवरील प्रेम व्यक्त करणारे, काळ्या पाण्याच्या कठोर शिक्षेलाही न झुकता स्वातंत्र्याची ज्योत अखंड पेटती ठेवणारे महान क्रांतिकारक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! 🚩

त्यांचे विचार, त्याग, राष्ट्रनिष्ठा आणि संघर्ष आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत. अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न पाहणाऱ्या या युगपुरुषांचा जीवनप्रवास, क्रांतिकारी कार्य आणि अद्वितीय देशभक्ती आजही प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची प्रेरणा जागवते. ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी अर्पण केले, अशा महान विचारवंत, साहित्यिक, समाजसुधारक आणि क्रांतिकारकाला विनम्र अभिवादन! 🙏

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

विनायक दामोदर सावरकर जयंती Graphic

क्रांतीची ज्वाला मनात घेऊन राष्ट्रभक्तीचा अखंड संदेश देणारे महान स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐

देशभक्ती, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारे त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. त्याग, संघर्ष आणि स्वाभिमानाची शिकवण देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

बकरी ईद Graphic

ईद-उल-अजहाच्या पवित्र सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!

त्याग, श्रद्धा, संयम आणि मानवतेची शिकवण देणारा हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, प्रेम, सुख-समृद्धी आणि शांततेचा प्रकाश घेऊन येवो. आपसातील बंधुभाव अधिक दृढ होवो, प्रत्येक घर आनंदाने उजळून निघो आणि समाजात एकता व सद्भावना कायम नांदो..

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद