धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर येथे आयोजित दैनिक अंबरनाथ टाइम्सच्या ३८ व्या वर्धापन दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. याप्रसंगी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. किसन कथोरे साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी “गौरव गाथा" भाग-५ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. समाजातील प्रेरणादायी कार्य, विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदान आणि स्थानिक घडामोडींना अधोरेखित करणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले.
तसेच महाराष्ट्राच्या लोककलेची परंपरा जपणारा “मदन मंजिरी” हा पारंपारिक लावणी कार्यक्रमही पार पडला. सांस्कृतिक वारसा आणि कलावंतांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷