Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

23 May 2026

3 linked posts
श्री. नितीन नबीन जी वाढदिवस Graphic

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा खासदार, कुशल संघटक माननीय श्री. नितीन नबीन जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

आपले नेतृत्व, कार्यतत्परता आणि संघटन मजबूत करण्यासाठीचे योगदान प्रेरणादायी आहे. देशहित आणि पक्षहितासाठी समर्पित असलेले आपले कार्य आम्हाला सदैव प्रेरणा देत राहतील. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जागतिक कुस्ती दिन Graphic

जागतिक कुस्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कुस्ती म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि मराठी मातीच्या अभिमानाचा जिवंत वारसा आहे. मातीचा सुगंध, अंगातील ताकद, मनातील जिद्द आणि शिस्तीची शिकवण देणारा हा आपल्या संस्कृतीचा मानबिंदू आहे.

अनेक पैलवानांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर देशभरात महाराष्ट्राची शान उंचावली आहे. या मातीतून घडणाऱ्या प्रत्येक पैलवानाला सलाम आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा! 🇮🇳✨

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Folk आख्यान प्रयोग Reel

अंबरनाथ येथील तालुका क्रीडा संकुल मैदान येथे Trident Group प्रस्तुत “द फोक आख्यान – थाट ह्यो जुना, खेळ हा नवा” हा महाराष्ट्राचा भव्यदिव्य आणि लोकप्रिय कार्यक्रम प्रथमच अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये आयोजित करण्यात आला होता.

लोकपरंपरा, संस्कृती आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम असलेल्या या सोहळ्यात सहभागी होता आले. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड उत्साह अनुभवायला मिळाला.

याप्रसंगी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. किसन कथोरे साहेब, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. रुचिताताई राजेंद्र घोरपडे तसेच अनेक मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद