अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात नागरिकांच्या विविध समस्या, सूचना व अडचणी जाणून घेत त्यावर संबंधित विभागांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
तसेच लेबर फ्रंट युनियन हॉकर्स शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. हॉकर्स बांधवांच्या मागण्या ऐकून घेत त्यांच्या निवेदनाची दखल घेण्यात आली असून शहरातील हॉकर्सच्या सोयीसाठी योग्य हॉकिंग झोन निश्चित करण्याबाबत हॉकर्स समितीला आवश्यक त्या सूचना व निर्देश देण्यात आले.
अंबरनाथच्या सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास, त्यांच्या अपेक्षा आणि शहराच्या विकासाची जबाबदारी लक्षात घेऊन प्रत्येक प्रश्न संवेदनशीलतेने व जबाबदारीने सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷