आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात नागरिकांनी विविध समस्या, अडचणी तसेच परिसराशी संबंधित विषय घेऊन भेट दिली. पाणीपुरवठा, स्वच्छता, गटार व्यवस्था, रस्त्यांची कामे, आरोग्य सुविधा, नागरी समस्या आणि इतर विषयांवर नागरिकांशी सविस्तर चर्चा करत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक सूचना देण्यात आल्या.
नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य देत त्यांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. शहरातील विकासकामे अधिक प्रभावीपणे पूर्ण व्हावीत, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक स्तरावर समन्वय साधण्यावर भर दिला जात आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷