नवरे पार्क, प्रभाग क्रमांक ३ येथे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील गटारांची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान तात्काळ संबंधित सफाई अधिकाऱ्यांना सूचना देत गटारांची स्वच्छता करून घेण्यात आली.
आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून आपल्या सर्वांच्या आरोग्याशी आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेली अत्यंत महत्त्वाची बाब आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांच्या समस्या वेळेत मार्गी लागाव्यात आणि प्रत्येक प्रभागात स्वच्छतेसह मूलभूत सुविधा सक्षम व्हाव्यात यासाठी प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷