आज मुंबईतील ताज प्रेसिडेंट येथे आयोजित करण्यात आलेल्या “Maharashtra 1st Conclave 2026” च्या चौथ्या आवृत्तीस उपस्थित राहण्याची संधी लाभली. ‘नवभारत व नवराष्ट्र’ या वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि पायाभूत विकासासंदर्भातील विचार मांडण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, ऊर्जा, बंदर विकास आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
“Magnetic Maharashtra” ही संकल्पना राज्याच्या प्रगतीला जागतिक स्तरावर नवी ओळख देणारी असून, विकसित आणि समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल निश्चितच प्रेरणादायी आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷