Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

18 May 2026

2 linked posts
नगरपरिषद कार्यालय Photos

आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात शहरातील विविध भागांतून काही नागरिक सदिच्छा भेटीसाठी आले होते, तर अनेकांनी आपल्या परिसरातील विविध समस्या, सूचना व अडचणी मांडल्या. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

यावेळी कचऱ्यासंबंधी समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या परिसरातील स्वच्छता, पाणी साचणे तसेच इतर नागरी समस्यांबाबत सूचना मांडल्या. संबंधित विभागांना आवश्यक सूचना देत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास यावेळी नागरिकांना देण्यात आला.

नागरिकांचा विश्वास, प्रेम व सतत मिळणारे सहकार्य हीच काम करण्याची प्रेरणा असून शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

पक्षप्रवेश सोहळा Reel

अंबरनाथ शहरातील स्वानंद हॉल येथे पक्षप्रवेशाचा भव्य सोहळा, कार्यकर्ता मेळावा व पदनियुक्ती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध भागातील नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय जनता पक्षावर विश्वास व्यक्त करत पक्षप्रवेश केला.

यावेळी संघटन अधिक सक्षम व बळकट करण्याच्या दृष्टीने विविध मोर्चा, आघाडी व प्रकोष्ठांमधील अनुभवी तसेच सक्रिय कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देत पदनियुक्ती करण्यात आली तसेच आगामी काळात अंबरनाथ शहराच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष श्री. गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील यांसह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे व पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन! 🌺

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷"

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद