अंबरनाथ पूर्व येथील लोक पॅराडाईज बिल्डिंग येथे भक्ती, श्रद्धा, अध्यात्म आणि संस्कार यांचा दिव्य संगम असलेल्या श्रीमद् भागवत कथा अखंड सप्ताह सोहळ्यात सहभागी होता आले. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून हरिनामाच्या गजरात आणि भागवत कथेमधील अमृतमय विचारांत भाविक तल्लीन झालेले पाहायला मिळाले.
यावेळी आरती करण्याचा मान लाभला तसेच खानदेशातील सुप्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प. श्री. देवदत्त महाराज यांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील व नगरसेविका सौ. स्वाती अतिश पाटील देखील उपस्थित होते. अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता, एकोप्याची भावना आणि अध्यात्मिक जागृती निर्माण होते.
नवीन पिढीपर्यंत आपल्या संस्कृतीचे आणि संस्कारांचे महत्त्व पोहोचवण्याचे कार्य अशा सप्ताह सोहळ्यांतून घडत असते. या भक्तिमय श्रीमद् भागवत कथा अखंड सप्ताह सोहळ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजक श्री. किरण नेमाडे तसेच सर्व सहकारी, भक्तगण आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷