Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

16 May 2026

2 linked posts
मुरारबाजी देशपांडे पुण्यतिथी Graphic

रणधुरंधर सेनानी, स्वराज्याचे निष्ठावंत शिलेदार मुरारबाजी देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🚩

पुरंदरच्या लढाईत अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यनिष्ठेचा आदर्श निर्माण करणाऱ्या या महान योद्ध्याचे बलिदान इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील. त्यांचे धैर्य आणि स्वाभिमान प्रत्येक मराठी मनाला सदैव प्रेरणा देत राहतील.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

श्री शनैश्वर जयंती Graphic

शनि जयंती निमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

सूर्यपुत्र, न्यायाचे अधिपती आणि कर्मफलदाता भगवान शनिदेव हे संयम, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक मानले जातात. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवून सत्य, न्याय आणि सेवाभावाचा मार्ग स्वीकारावा, हीच शनिदेवांची शिकवण आहे.

आजच्या या पवित्र दिवशी भगवान शनिदेवांच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनातील संकटे, दुःख आणि अडचणी दूर होऊन सुख, समृद्धी, आरोग्य आणि मानसिक समाधान लाभो, हीच प्रार्थना.

॥ ॐ शनैश्चराय नमः ॥

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद