मोरिवली गाव, अंबरनाथ येथे आई जीवदानी मंदिराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त होम-हवन पूजा तसेच श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री सत्यनारायण भगवानाचे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य व मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली.
प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका सौ. वैशाली थेटे व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्या प्रभागात सातत्याने असे धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येत असून, त्यामधून समाजात एकता, श्रद्धा व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीची भावना अधिक दृढ करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे मोठे योगदान आहे. यासाठी सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार..
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷