Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

14 May 2026

5 linked posts
केंद्रीय कार्यकारणी बैठक Photos

अंबरनाथ येथील कम्युनिटी हॉल येथे भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ आयोजित केंद्रीय कार्यकारणी बैठकीस उपस्थित राहण्याचा योग आला. या बैठकीचे आयोजन आयुध निर्माणी मजदूर संघ, अंबरनाथ व प्रतिरक्षा मजदूर संघ, अंबरनाथ यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी कल्याण पश्चिमचे माजी आमदार श्री. नरेंद्र पवारजी तसेच भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. अशा बैठकीतून संघटनात्मक एकजूट अधिक दृढ होत असून कामगारांना नवी ऊर्जा व दिशा मिळत आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी वाढदिवस Graphic

समाजप्रबोधन, निरपेक्ष सेवा आणि मानवतेचा संदेश देत लाखो जीवनांना सकारात्मक दिशा देणारे पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐

त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी आणि निस्वार्थ कार्याने अनेकांना समाजासाठी कार्य करण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे. संस्कार, शिस्त, सेवा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येकासाठी आदर्शवत आहे. त्यांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! 🙏🏻

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

छत्रपती संभाजी महाराज जयंती Graphic

स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर, पराक्रम आणि स्वाभिमानाचे तेजस्वी प्रतीक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धर्म आणि स्वराज्याचे रक्षण करत त्यांनी दिलेला संघर्ष, त्याग आणि शौर्याचा इतिहास प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा अदम्य आत्मविश्वास, विद्वत्ता आणि राष्ट्रनिष्ठा आपल्याला सदैव अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

हळदी समारंभ आणि विवाह सोहळा Photos

मोरीवली अंबरनाथ येथे चि. रोहित व चि.सौ.कां. प्रांजली यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देण्यात आले. उपस्थित आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि मान्यवरांच्या शुभेच्छांनी सोहळ्याला विशेष शोभा प्राप्त झाली.

तसेच चि.सौ.कां. प्रणाली व चि. निकेश यांच्या हळदी समारंभास भेट देऊन त्यांना पुढील वैवाहिक आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आले.

दोन्हीही नवदाम्पत्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, प्रेम, उत्तम आरोग्य आणि अखंड आनंद नांदो, त्यांच्या सर्व स्वप्नांना यश लाभो, हीच सदिच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Udaan fest Reel

“उडान फेस्ट २०२६ - स्वप्नांना देऊया भरारी” या प्रदर्शनाचा दुसरा दिवस उत्साह, आनंद आणि महिलांच्या आत्मविश्वासाने भरलेल्या वातावरणात अतिशय सुंदररीत्या पार पडला.

यावेळी अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देत महिला उद्योजिकांचे कौतुक केले व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले. विविध स्टॉल्सना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उत्कृष्ट आयोजन, नियोजन आणि सहभागी झालेल्या प्रत्येक महिला उद्योजिकेच्या मेहनतीमुळे हा दिवस अधिक विशेष ठरला.

या उपक्रमाला भेट देऊन महिलांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या सर्व मान्यवर, नागरिक आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार! 💐 “उडान फेस्ट” हा उपक्रम महिलांच्या आत्मविश्वासाला आणि स्वप्नांना मिळालेली नवी भरारी आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद