महिलांच्या कला, कौशल्य आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या “उडान फेस्ट” प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य श्री. गुलाबराव करंजुले पाटील, ह.भ.प. पुरुषोत्तम उगले महाराज, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. अर्चना नाना सूर्यवंशी, कुळगाव बदलापूर नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. रुचिता घोरपडे, नवीन कल्याण मंडल महिला अध्यक्षा सौ. भावना मनराजा, कल्याण पूर्व महिला अध्यक्षा सौ. सविता देशमुख, जिल्हा बेटी बचाओ बेटी पढाओ संयोजिका दिव्या शिंदे, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजित गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच नगरसेविका सौ. मीना वाळेकर व अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
“उडान फेस्ट”च्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या व्यवसायाला आणि कलागुणांना एक सक्षम व्यासपीठ मिळत असून, हीच संकल्पना अधिक बळकट करण्यासाठी आयोजिक महिला मोर्चा अध्यक्षा सौ. कंचन मिश्रा आणि सौ. पौर्णिमा जाधव यांचे विशेष अभिनंदन.
या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व स्टॉल धारकांनी आपल्या कला, कौशल्य आणि उत्पादनांचे सुंदर सादरीकरण केले. तसेच प्रदर्शनाला भेट देऊन महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷