Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

12 May 2026

3 linked posts
श्री संत मुक्ताबाई पुण्यतिथी Graphic

अखंड भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या थोर संत कवयित्री श्री संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र त्यांना अभिवादन! 🙏🏻

संत परंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या मुक्ताई यांनी आपल्या ओव्यांमधून समाजाला आत्मज्ञान, नम्रता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचे विचार हे केवळ अध्यात्म नसून जीवन जगण्याची सुंदर शिकवण आहेत.

मान-अपमान, अहंकार आणि द्वेष यापलीकडे जाऊन शांत, संयमी आणि सद्गुणी जीवन जगावे हा संदेश देणाऱ्या मुक्ताई आजही प्रत्येकाच्या मनात श्रद्धेचे स्थान निर्माण करतात. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण अभिवादन! 🙏🏻

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

ड्रेनेज व्यवस्था पाहणी Reel

कमलाकर नगर येथे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलनिस्सारण व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक श्री. उमेश पाटील, नगरसेविका सौ. दर्शना पाटील व अंबरनाथ महानगरपालिकेचे अधिकारी श्री. सुनील जाधव उपस्थित होते.

नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन परिसरातील पाणी साचण्याची कारणे तपासण्यात आली तसेच पाणी निचरा सुरळीत राहावा यासाठी आवश्यक त्या तांत्रिक व तात्काळ उपाययोजना राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी व प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

बदलापूर Wedding Reception Photos

बदलापूर येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे चि.सौ.कां. अंजली आणि चि. राहुल यांच्या विवाह स्वागत समारंभाला उपस्थित राहण्याचा योग आला.

या सुंदर व मंगलमय प्रसंगी नवदांपत्याला पुढील आयुष्यासाठी सुखी, समृद्ध आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभाशीर्वाद देण्यात आले. 💐

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद