माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प करूया.. स्वदेशी वस्तूंचा स्वीकार, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरणपूरक सवयी आणि भारतीय उद्योगांना बळ देणारे प्रत्येक पाऊल हे विकसित भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
एक सजग नागरिक म्हणून आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या सवयींमधूनही देशसेवा घडू शकते. स्वावलंबन, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशीचा स्वीकार या माध्यमातून सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यात प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷